पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आता भारत सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतले असून, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2025 | 9:41 PM

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीमथ्ये अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

काय आहेत निर्णय

पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही

सिंधु पाणी कराराला स्थगिती

पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश

अटारी बॉडर बंद करण्यात आली

पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवलं

पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं मोठं पाऊल उचललं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज परराष्ट्र मंत्रालयाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये सिंधु पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले असून, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर आता सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमधील तब्बल 1500 लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, यापूर्वी ज्यांचा दहशतवादी कारवायांशी संबंध आला होता, किंवा जे संशयित आहेत, अशा लोकांना चौकशीसाठी तब्यात घेण्यात आलं आहे. तसेच या दहशतवाद्यांना ज्यांनी आश्रय दिला होता, त्यांचा देखील शोध सुरक्षा एजन्सीकडून सुरू आहे. दहशतवादी कारवाया मागील स्लिपर सेलचा देखील शोध सुरू आहे.

वीस लाखांचं बक्षीस   

मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यांना जम्मू काश्मीर पोलिसांकडून वीस लाखांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज जम्मू -काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पहिल्यांदाच जम्मू -काश्मीरमध्ये असं चित्र दिसलं. काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांमध्ये या बंदला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.