पतीच्या मोबाइलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो… एअर इंडिया कर्मचाऱ्याच्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, भाऊ परदेशातून परतला
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पतीच्या मोबाईलमध्ये एक फोटो होता. तो फोटो पत्नीने पाहिला आणि त्यानंतर भंयकर घडलं. नेमकं काय झालं? वाचा...

गुरुग्रामच्या सेक्टर-७१ स्थित एका लक्झरी सोसायटीत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याची पत्नी कीर्तिमई मिश्रा (४४) यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिस चौकशी आणि कुटुंबीयांकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार, बुधवार रात्री पतीच्या मोबाइलमध्ये एका महिला सहकाऱ्यासोबतचा फोटो पाहिल्यानंतर दोघांमध्ये तीव्र वाद झाला होता. त्यानंतर कीर्तिमई यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी दुसऱ्या खोलीत जाऊन स्वत:चे जीवन संपवले.
नेमकं काय घडलं?
कीर्तिमई मूळच्या ओडिशाच्या भुवनेश्वरच्या रहिवासी होत्या आणि गुरुग्रामच्या स्मार्ट वर्ल्ड कंपनीत लर्निंग अँड टॅलेंट डेव्हलपमेंट हेड या पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती युवराज शर्मा मुंबईचे रहिवासी आहेत आणि एअर इंडियामध्ये केबिन क्रूला ट्रेनिंग देण्याचे काम करतात. दोघांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केले होते आणि त्यांना ९ वर्षांची एक मुलगी आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात पती युवराज यांनी सांगितले की, बुधवार रात्री सुमारे ९:३० वाजता कीर्तिमई मुलगी आणि त्यांच्यासोबत बिछान्यावर झोपलेल्या होत्या. त्याच वेळी त्यांनी युवराजचा मोबाइल फोन पाहिला. फोनच्या गॅलरीत एअर इंडिया अकादमी स्टाफच्या फोटोंमध्ये युवराजचा एका महिला सहकाऱ्यासोबतचा फोटो होता. हा फोटो पाहताच कीर्तिमईंना संशय आला आणि त्यांनी चौकशी सुरू केली. गोष्ट इतकी वाढली की दोघांमध्ये तीव्र वाद झाला आणि टोकाचे भांडण झाले.
रागात दुसऱ्या खोलीत गेली
भांडणानंतर रागात कीर्तिमई दुसऱ्या खोलीत गेल्या आणि आतून दार लॉक करुन घेतले. युवराजला वाटले की रात्री राग शांत होईल आणि सकाळपर्यंत सर्व सामान्य होईल. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी खूप वेळ दार उघडले नाही, तेव्हा युवराज यांनी आवाज दिला आणि दार ठोठावले. आतून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने जेव्हा त्यांनी बाल्कनीच्या मार्गाने खिडकीतून खोलीत डोकावले, तेव्हा कीर्तिमई पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसल्या.
भावाने ४ दिवसांपूर्वी राखी बांधली होती
युवराज यांनी घाईघाईने बेडरुमचा दरवाजा तोडला. त्यामुळे त्यांच्या बोटांना आणि गुडघ्याला खोल जखमा झाल्या. त्यानंतर त्यांनी पोलिस आणि मित्रांना माहिती दिली. बादशाहपूर ठाणे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शव ताब्यात घेतले. कुटुंबीयांनी सांगितले की, कीर्तिमईचा धाकटा भाऊ शिक्षणासाठी परदेशात जाणार होता आणि घटनेच्या केवळ चार दिवस आधीच आपल्या बहिणीकडे गुरुग्राम येथे येऊन राखी बांधून गेला होता. बहिणीच्या मृत्यूची बातमी कळताच तो शुक्रवार सकाळी फ्लाइटने परत गुरुग्रामला पोहोचला, त्यानंतर शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. सध्या पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे.