Maharashtra News LIVE : मुंबईकडे कूच करण्यासाठी जरांगे पाटलांचा बी प्लॅन तयार
Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच आजपासून अंतरवाली सराटीमध्ये शेवटचं निर्णायक आंदोलन सुरू होणार आहे. सकाळी 10 वाजता जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावातल्या उपोषण स्थळावरच उपोषण सुरू करतील. जरांगे पाटलांच्या शेवटच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव अंतरवाली गावात दाखल झाले आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
आंदोलनात तोडगा काढण्यात आदिवासी विकास विभागला यश
आंदोलनात तोडगा काढण्यात आदिवासी विकास विभागला यश आलं आङे. विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवून विद्यार्थी अमरावतीकडे परत जाणार आहेत. 1 सप्टेंबरला मुंबई येथे बैठक घेण्याचं विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं.
-
मुंबईकडे कूच करण्यासाठी जरांगे पाटलांचा बी प्लॅन तयार
अंतरवाली सराटी येथे आज सकाळी दहा वाजल्यापासून जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मात्र, त्याआधी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सरकारकडे गुणरत्न सदावर्ते यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही, तर मुंबईकडे कूच करण्यासाठी जरांगे पाटलांचा बी प्लॅन तयार असल्याचा दावा काळकुटे यांनी केला आहे.
-
-
लोकांनी मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेणं सोडलय – संजय राऊत
मुख्यमंत्री फडणवीस भ्रष्टाचाराला समर्थन देतायत. नाशिककरांनी मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकलाय. लोकांनी मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेणं सोडलय असा दावा संजय राऊत यांनी केला.
-
सरकारने मराठा समाज बांधवांचा अंत पाहू नये
सरकारने मराठा समाज बांधवांचा अंत पाहू नये, आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. समाज बांधवांनी विश्वास व्यक्त केला. अंतरवाली सराटी गावात मराठा समाज बांधव दाखल.
-
जरांगे पाटील यांचं आजपासून अंतरवाली सराटी मध्ये शेवटचं निर्णायक आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून अंतरवाली सराटी मध्ये शेवटचं निर्णायक आंदोलन सुरू होणार. सकाळी 10 वाजता जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावातल्या उपोषण स्थळावर उपोषण सुरू करतील. जरांगे पाटलांच्या शेवटच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव अंतरवाली गावात दाखल झाले आहेत.
-
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. 58 लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची पडताळणी तातडीने करावी ही त्यांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर मध्ये काल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं होतं. खरंतर जात वैधता प्रमाणपत्र काढण्याच्या संदर्भात गेल्या आठ महिन्यांपासून सोनवणे कुटुंब जात पडताळणी समितीकडे चकरा मारत आहे. मात्र कागदपत्राची पूर्तता करूनही जात प्रमाणपत्र निघत नसल्याने सोनवणे कुटुंब काल पाण्याच्या टाकीवर चढून संतापल्याचं पहायला मिळालेलं होतं. मात्र जरांगे पाटील यांनी फोन द्वारे संवाद साधून त्यांना अंतरवलीत येण्याचा आवाहन केलं होतं. त्यामुळे ते थेट आता आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे.
Published On - Aug 29,2026 9:28 AM
