AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांची उपोषणाआधीच सरकारकडे सर्वात मोठी मागणी, थेट सरकारलाच दिलं चॅलेंज

मनोज जरांगे यांची उपोषणाआधीच सरकारकडे सर्वात मोठी मागणी केली आहे. जरांगे यांनी मागणी करून थेट सरकारला चॅलेंज दिलं आहे.

मनोज जरांगे यांची उपोषणाआधीच सरकारकडे सर्वात मोठी मागणी, थेट सरकारलाच दिलं चॅलेंज
manoj jarangeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 9:54 AM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या उपोषणाआधीच मनोज जरांगे यांनी सर्वात मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जात पडताळणी समिती रद्द केली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. देशात कुठेही नसताना फक्त महाराष्ट्रात जात पडताळणी समिती कशाला हवी, असा सवाल देखील जरांगे यांनी यावेळी उपस्थित केला.

मनोज जरांगे हे सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत. या उपोषणाआधी मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकार शेतकऱ्यांना पैसे देत नाहीये. लाडक्या बहि‍णींना पैसे देत नाही. गोरगरिबांना पैसै देत नाही. मराठ्यांना मोठं होऊ दिलं जात नाही. सरकारच्या हातात अधिकार आहेत. मराठा समाजाने ही लढाई समजून घ्यावी. आपले लेकरं अधिकारी होणे गरजेचे आहेत. दुसरे अधिकारी असल्याने तुमच्यावर जळायला लागले आहेत. तुमचे अधिकारी कधी करणार? फक्त नेते मोठे करायचे आहेत का? मराठे समाजाने समजून घेतले पाहिजे की, तुमचे लेकरं अधिकारी झाल्यास तुम्हाला अडचणी येणार नाहीत’.

‘आपण आनंदाने सर्व स्वीकरालं. आता खुर्चीवर ते बसले आहेत. मराठ्यांचे वाटोळं करत आहेत. तरी अजून वेळ गेलेला नाही. तुमच्या लेकरांना अधिकारी करा. तुमचे कामे होत राहील. आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण मिळवून देऊ. आता आपण भोगतोय, ते पुढच्या पिढीला त्रास होणार नाही. अधिकाऱ्यांना जातपात नसावी. परंतु यांच्या डोक्यात गलिच्छ विचार आहेत. आपले लेकरं असले तर त्यांना समाजाविषयी दया निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.

‘इतरांची SEBC आरक्षण टिकलं पाहिजे, ही मागणी योग्य आहे. सरकारला आम्हाला आरक्षण मिळू द्यायचं नाही. पुरावे असूनही पुन्हा पुन्हा छानन्या करायच्या आहेत. अधिकारी जात पडताळणी रद्द करत आहेत. अधिकारी हेतूपूर्वक करत आहेत. या देशात जात पडताळणी रद्द केली पाहिजे. देशात कुठेच जात पडताळणी समिती नसायला पाहिजे. देशात कुठेच नाही. जात प्रमाणपत्र दिल्यानंतर पुन्हा जात पडताळणी कशाला…फक्त महाराष्ट्रात कशाला जात पडताळणी समिती हवी? महाराष्ट्रात अधिकारी आहेत. सर्व जातीच्या लोकांचा प्रश्न आहे. ही समिती बरखास्त केली पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली.

Follow Us