‘वर्षा’वर तर जाणारच, जरांगेंचा थेट इशारा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारला थेट इशारा देत त्यांनी वर्षा (मुख्यमंत्री निवासस्थान) वर जाण्याचा निर्धार व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे जाणूनबुजून मराठा समाजाला त्रास देत […]
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारला थेट इशारा देत त्यांनी वर्षा (मुख्यमंत्री निवासस्थान) वर जाण्याचा निर्धार व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे जाणूनबुजून मराठा समाजाला त्रास देत आहेत. मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाल्याशिवाय सरकारला सुखानं खाऊ देणार नाही. मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याच्या कृतीवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व मराठा बांधवांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी नमूद केले की, मराठा आरक्षणाचे हे आंदोलन शेवटचे आणि निर्णायक असून, सर्वांनी घराबाहेर पडून न्याय हक्कासाठी लढावे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
Published on: Aug 28, 2026 09:39 PM
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?

