अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ
अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेली अमराठी चालकांवरील कारवाई तूर्तास थांबली आहे. याआधी सरनाईकांनी दोन वेळा मुदतवाढ देऊनही मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर मुंबईतील अमराठी रिक्षाचालकांनी जल्लोष साजरा केला. गोरेगाव येथे भाजपच्या धडक […]
अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेली अमराठी चालकांवरील कारवाई तूर्तास थांबली आहे. याआधी सरनाईकांनी दोन वेळा मुदतवाढ देऊनही मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर मुंबईतील अमराठी रिक्षाचालकांनी जल्लोष साजरा केला.
गोरेगाव येथे भाजपच्या धडक कामगार युनियन महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुलाल उधळण्यात आला, लाडू वाटण्यात आले आणि भोजपुरी गाण्यांवर रिक्षाचालकांनी नृत्य केले. भाजपच्या कामगार आघाडीचे अभिजीत राणे यांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांना इशारा देत उत्तर भारतीय चालकांवर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही असे सांगितले. या निर्णयामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस निर्माण झाल्याची चर्चा आहे. परिवहन मंत्र्यांचा निर्णय फिरवल्याने शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
विरोधकांनी हा निर्णय उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतदारांना खुश करण्यासाठी घेतल्याचा आरोप केला आहे. सध्या तरी अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत मिळाली आहे.
Published on: Aug 28, 2026 09:25 PM
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...

