AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air India: धक्कादायक… हवेतच गडबड… अचानक विमान लागलं खाली यायला, 12 जण जखमी; नेमकं काय घडलं?

थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमानाला हवेच्या तीव्र झटक्यांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला, ज्यामुळे विमानाच्या उंचीत क्षणभराचा बदल झाला.

Air India: धक्कादायक... हवेतच गडबड... अचानक विमान लागलं खाली यायला, 12 जण जखमी; नेमकं काय घडलं?
| Updated on: Aug 04, 2026 | 2:25 PM
Share

थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमानाला हवेच्या तीव्र झटक्यांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला, ज्यामुळे विमानाच्या उंचीत क्षणभराचा बदल झाला. विमानाने दिल्लीत सुरक्षित लँडिंग केले. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षितपणे खाली उतरले. ही घटना मंगळवारी घडली. काही प्रवासी आणि कर्मचारी किरकोळ जखमी झाले. खबरदारीचा उपाय म्हणून, त्यांना तपासणी आणि उपचारासाठी विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. विमानाचा फ्लाईट क्रमांक AI2379 आहे.

एअर इंडियाने म्हटले आहे की, “प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे आणि घटनेच्या तपासात संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. 4 ऑगस्ट रोजी, फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या AI2379 या फ्लाईटला प्रवासादरम्यान हवेच्या तीव्र झटक्यांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला, ज्यामुळे विमानाच्या उंचीत अचानक बदल झाला. विमानाने दिल्लीत सुरक्षित लँडिंग केले आणि सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत.”

एअरलाइनने पुढे सांगितले, “किरकोळ जखमी झालेल्या काही प्रवाशांना आणि क्रू सदस्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावरील वैद्यकीय सुविधेकडे नेण्यात आले आहे. प्रवासी आणि क्रू सदस्यांची सुरक्षा आणि कल्याण हे एअर इंडियाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही बाधित झालेल्यांना सर्व आवश्यक मदत पुरवत आहोत आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत.”

अचानक बसलेल्या धक्क्यामुळे विमानातील अनेक प्रवाशांचा तोल गेला. या घटनेत बारा प्रवासी आणि चार केबिन क्रू सदस्य जखमी झाले. एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, बहुतेकांना किरकोळ दुखापत झाली आहे. दिल्लीत आगमन झाल्यावर, एका वैद्यकीय पथकाने जखमींची तपासणी करून आवश्यक उपचार केले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांना तात्काळ सतर्क करण्यात आले. गरज भासल्यास त्वरित मदत पुरवण्यासाठी विमान उतरण्यापूर्वीच वैद्यकीय आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांना सज्ज ठेवण्यात आले होते. विमान सुरक्षितपणे उतरल्यानंतर, जखमी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं