Air India : उडत्या विमानात ती, दारु आणि चखणा, एअर इंडियाला भरावा लागणार 30 लाखांचा दंड , DGCA ची कारवाई

फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये पायलटच्या वतीने महिला मैत्रिणीला फोन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला दंड ठोठावला आहे. पायलटला निलंबित करण्याव्यतिरिक्त, डीजीसीएने सह-वैमानिकाला इशारा दिला.

Air India : उडत्या विमानात ती, दारु आणि चखणा, एअर इंडियाला भरावा लागणार 30 लाखांचा दंड , DGCA ची कारवाई
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 11:12 AM

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमान प्रवासादरम्यान पायलटने (pilot) महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कठोर भूमिका घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी एअर इंडियाला (Air India) 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीएने हे नियमांचे उल्लंघन मानले आहे. खरंतर हे प्रकरण 27फेब्रुवारीचे आहे. फ्लाइट प्रवासादरम्यान त्या पायलटने मैत्रिणीला कॉकपिटमधून (cockpit) प्रवास करू दिला . एवढंच नव्हे तर तिला बिझनेस क्लास ट्रीटमेंट मिळत राहिली. मात्र या सगळ्यात प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. यासंदर्भात नियामकाने एका निवेदनात म्हटले आहे की विमान चालवणाऱ्या पायलटला 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

पायलटला निलंबित करण्याव्यतिरिक्त, डीजीसीएने सह-वैमानिकाला असे प्रकार थांबवण्याचा इशारा दिला. याशिवाय एअर इंडियाला विशिष्ट कालावधीसाठी संस्थेत कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका क्रू मेंबरने या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती, त्यानंतर एअरलाइन आणि डीजीसीए दोघेही तपास करत होते.

काय घडलं होतं ?

दुबई ते दिल्ली या विमान प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या पायलटने आपल्या महिला मैत्रिणीला स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी तिला कॉकपिटमध्ये बसवून प्रवास करायला दिला. एवढंच नव्हे तर यादरम्यान तिला बिझनेस क्लास ट्रीटमेंट मिळत राहिली. केबिन क्रूने याबाबत डीजीसीएकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्याचवेळी एअर इंडियानेही त्यांच्या वतीने तपास सुरू केला.

महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसवणे पडले महागात

या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. त्यावरून असे कळते की, एका पायलटने आपल्या महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसवून प्रवास करायला लावलाच, पण तिला तिथे अल्कोहोल आणि स्नॅक्सही ऑफर केले. पायलटच्या या मैत्रिणीने इकॉनॉमी क्लासचे तिकीट काढले होते. पण त्या पायलटला तिला बिझनेस क्लासचा आनंद द्यायचा होता. त्यासाठी तो केबिन क्रूशीही बोलला. मात्र, त्यावेळी बिझनेस क्लास फुल असल्याने त्या पायलटने जुगाड करून त्या मैत्रिणीला कॉकपिटमध्येच बसवले. मात्र हे नियमांचे पूर्ण उल्लंघन होते.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.