आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासह 3 सीजेपीच्या नेत्यांना अटक, जेलमध्ये पाठवण्याची भीती, रात्री उशीरा..

दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सीजेपीचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. काल सीजेपीचे नेते सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांनी जंतरमंतरवर येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासह 3 सीजेपीच्या नेत्यांना अटक, जेलमध्ये पाठवण्याची भीती, रात्री उशीरा..
Ajinkya Shinde Sourav Das and Ashutosh Ranka
| Updated on: Oct 14, 2026 | 7:14 AM

जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार होती. मात्र, त्यापूर्वीच अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी विमानातूनच पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करत त्यांना काही नियम अटी ठेऊन जामीन देण्यात आला. अभिजीत दिपकेंच्या आजीचे निधन झाल्याने ते हिंगोलीत आहे. इंडिया आघाडीची मोर्चे काढताना दिसत आहे. दिल्ली पोलिस अलर्ट मोडवर आहेत. कॉकरोच जनता पार्टीने आपल्या कार्यकर्त्यांना सध्याच दिल्ली न सोडण्याचे आदेश दिले आहेत. जंतरमंतरवर येण्यास बंदी आहे. त्यातच काल सीजेपीचे नेते सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांनी जंतरमंतरवर येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठी धरपकड बघायला मिळाली. जंतरमंतरवर आंदोलन केल्या प्रकरणी सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.

दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्यात तिघांनाही ठेवण्यात आल्याची रत्ना सिंग यांनी माहिती दिली. बेकायदेशीर पणे जंतरमंतरवर जाने, बॉण्डच्या अटींचे उल्लंघन आणि सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा तिघांवरही आरोप करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना अटक केल्याचे कळतंय.

Loading...

यादरम्यानच सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पोस्ट शेअर करत म्हटले की, त्यांचे मनोधैर्य कोणीही खचवू शकत नाही. सीजेपी आक्रमक भूमिका घेत आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे दिल्ली अलर्ट मोडवर आहे. जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी सीजेपीला दिली नाहीये.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आक्रमक भूमिका घेत आहे. त्यातच अनेक मोठ्या अपडेट पुढे येत आहेत. काही महिन्यांपूर्वीच सीजेपीने मोठे आंदोलन नीट पेपरफुटीविरोधात पुकारले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारले होते. सीजेपीची आक्रमक भूमिका ज्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला.

वकील रत्ना यांनी पुढे लिहिले की, त्यांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्या वकिलांना भेटू दिले गेले नाही. पहाटे 3 वाजता त्यांना एका खाजगी व्हॅनमधून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या बेकायदेशीर कृतींनंतरही त्यांचे मनोधैर्य खचलेले नाही. आज पहाटे ही माहिती देताना रत्ना यांनी सांगितले की, त्या तिघांना एका तासाच्या आत एसईएम समोर हजर केले जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us