AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके यांचे इंडिया आघाडीच्या आंदोलनावर मोठे भाष्य, थेट म्हटले, त्यांचे..

अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून लढा देत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याकरिता सीजेपीने आंदोलन पुकारले. त्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली. आता अभिजीत दिपके यांनी सरकारला मोठा इशारा दिला.

अभिजीत दिपके यांचे इंडिया आघाडीच्या आंदोलनावर मोठे भाष्य, थेट म्हटले, त्यांचे..
Abhijeet Dipke
| Updated on: Oct 13, 2026 | 9:42 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुकारले. दिल्लीतील जंतर मंतरवर येथे ते आंदोलन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले. जंतर मंतरवर जाण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली होती. विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांच्या पथकाने विमानात प्रवेश करून तिघांना ताब्यात घेतले. मुंबईहून दिल्लीपर्यंत पोहोचूपर्यंत त्यांच्या प्रवासात कोणतीही दखल पोलिसांनी घेतली नाही. मात्र, दिल्लीत दाखल होताच ताब्यात घेतले. अभिजीत दिपके यांनी ही हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे आणि आपण अटकेसाठीच दिल्लीत आल्याचे सांगितले. यादरम्यान अभिजीत दिपके यांच्या आजीने जगाचा निरोप घेतला. मात्र, त्याला आजीच्या अखेरच्या दर्शनासाठी हिंगोलीत येता आले नाही.

आपला लढा अर्धवट सोडून अभिजीत दिपके हिंगोलीत पोहोचला. कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिल्लीतच थांबण्यास सांगण्यात आले. यादरम्यान अभिजीत दिपके यांनी मोठे भाष्य केले. आज अभिजीत दिपके दिल्लीकडे रवाना होण्याची शक्यता आहे. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, मोदींना जंतर मंतरसोबत नाही तर आंदोलनाशी प्रॉब्लेम आहे.

सौरभ आणि आशुतोष सध्या दिल्लीत आहेत, आमच्या पुढच्या रणनीतीबद्दल तेच बोलतील. आता संपूर्ण देशभरात आंदोलन होईल. कोर्ट सरळ पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले की, यावेळी मतदान करू शकते नाही तर मग पुढच्यावेळी मतदान करा. तर मग कोर्ट मोदींना हेच बोलू शकते का? यावेळी निवडणुका लढू नका, पुढच्यावेळी लढा?

मग जर तुम्ही त्यांना हे बोलू शकत नाहीत, तर तुम्ही मतदारांना हे कसे बोलू शकता. काल जे इंडिया आघाडीचे आंदोलन दिल्लीत झाले, त्यांना मी शुभेच्छा देतो. मोठे आंदोलन होते आणि ते गरजेचे होते. काल इंडिया आघाडीने मोठा मोर्चा काढला. त्यांनी हा मोर्चा थेट कोर्टावर काढला. त्यातच सीजेपीही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाम आहे. दिल्लीत घडामोडींवर वेग आला.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान