AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: आजीच्या शेवटच्या भेटीची आस अपुरी.. ढसाढसा रडले अभिजीत दिपके; मनात कायम राहिल सल

Abhijeet Dipke: अभिजीत यांनीही पोलिसांच्या वागणुकीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. आजीच्या निधनानंतर कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी फोन मागितल्याचं आणि त्यांना पुरेशी संधी मिळाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Abhijeet Dipke: आजीच्या शेवटच्या भेटीची आस अपुरी.. ढसाढसा रडले अभिजीत दिपके; मनात कायम राहिल सल
अभिजीत दीपकेImage Credit source: Facebook
| Updated on: Oct 12, 2026 | 8:40 AM
Share

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजीच्या निधनानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आजीच्या अंत्यसंस्कारासाठी अभिजीत यांना वेळेत घरी पोहोचता आलं नाही, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी दिल्ली पोलिसांवर केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी कुटुंबीयांचे आरोप फेटाळत अभिजीत यांना आजीच्या निधनाची माहिती दिली होती आणि गावी जाण्यासाठी मदत करण्याची तयारीही दर्शवली होती, असा दावा केला आहे. या संपूर्ण वादादरम्यान आता अभिजीत दिपके यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. शेवटचं आजीचा भेटताही आलं नाही, याचं दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आजीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर अभिजीत त्याठिकाणी पोहोचले आणि तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.

अभिजीत दिपके यांचा भावूक करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते आपल्या आजीच्या राखेसमोर बसून ढसाढसा रडताना दिसत आहेत. आजीच्या निधनानंतर त्यांना अंत्यदर्शनही घेता आलं नाही, याची सल त्यांच्या मनात असल्याचं या दृश्यातून जाणवतं. आयुष्यात ज्या व्यक्तीने प्रेम आणि माया दिली, त्या आजीला शेवटचं पाहण्याची संधीही मिळाली नाही, या विचाराने अभिजीत भावुक झाले आहेत. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि असहायता पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.

पहा व्हिडीओ-

अभिजीत दिपके हे त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आवाज उठवत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांच्या पक्षाने दिल्लीतील जंतरमंतर इथं आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर अभिजीत दिपके यांच्यासह पक्षाचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच दरम्यान अभिजीत यांच्या आजी सावित्रीबाई शंकरराव दिपके यांचं महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावात निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. आजीच्या निधनानंतरही अभिजीत पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहता आलं नाही, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला.

अभिजीत यांच्या आई अनिता दिपके यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या मुलाला आजीच्या शेवटच्या दर्शनासाठीही जाता आलं नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अभिजीत यांना वेळेत सोडण्यात यावं, यासाठी पोलिसांकडे वारंवार विनंती करण्यात आली होती. मात्र, या विनंत्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी अभिजीत यांना आजीच्या निधनाची माहिती वेळेत दिल्याचं सांगितलं आहे. त्यांना अंत्यसंस्काराची वेळही कळवण्यात आली होती. तसंच, महाराष्ट्रात जाण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवण्यात आली होती; मात्र अभिजीत यांनी ही मदत स्वीकारली नाही, असा पोलिसांचा दावा आहे. आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी अभिजीत यांना आजीच्या निधनाची माहिती देतानाचा व्हिडीओही प्रसिद्ध केला.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?