मोठी बातमी! अखिलेश यादव यांच्यावर डिजिटल स्ट्राईक? पुन्हा अधिकृत फेसबुक पेज सस्पेंड

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं फेसबुक पेज सस्पेंड करण्यात आलं आहे. यापूर्वी देखील एकदा त्यांचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं.

मोठी बातमी! अखिलेश यादव यांच्यावर डिजिटल स्ट्राईक? पुन्हा अधिकृत फेसबुक पेज सस्पेंड
Akhilesh Yadav
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 9:48 PM

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचं अधिकृत फेसबुक पेज सोमवारी पुन्हा एकदा सस्पेंड करण्यात आलं आहे. यापूर्वी गेल्या वर्षी दहा ऑक्टोबरला देखील त्यांचं अधिकृत फेसबुक अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं. मात्र काही वेळातच त्यांचं फेसबुक अकाउंट पुन्हा पूर्ववत करण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा अखिलेश यादव यांचं फेसबुक पेज सस्पेंड करण्यात आलं आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही समस्या निर्माण झाली आहे की, फेसबुकची पॅरंट कंपनी असलेल्या मेटाने दंडात्मक कारवाई केली आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जे फेसबुक पेज सस्पेंड करण्यात आलं आहे, ते अखिलेश यादव यांच्या नावाने असलेलं अधिकृत फेसबुक पेज आहे. या फेसबुक पेजचे तब्बल 90 लाख फॉलोअर्स आहेत.

मात्र या संदर्भात अद्याप मेटाकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. काही नेत्यांच्या हवाल्याने समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार काही तांत्रिक कारणांमुळे हे फेसबुक पेज सस्पेंड झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याचदरम्यान याबद्दल माहिती देणारं एक ट्विट देखील समाजवादी पार्टीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलं आहे. माननीय राष्ट्रीय अध्यक्षांचं फेसबुक पेज अस्थाई स्वरुपात काम करत नसल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Loading...

समाजवादी पार्टीची प्रतिक्रिया

दरम्यान अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर पक्षाकडून ट्विट करत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे अखिलेश यादव यांचं फेसबुक पेज सध्या काम करत नाहीये, मेटा या समस्येवर काम करत आहे, अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे, दरम्यान गेल्या वर्षी दहा ऑक्टोबरला अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाउंट सस्पेंड झालं होतं. त्यावेळी काही समाजवादी पार्टीच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर आरोप करण्यात आले होते. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकारच्या इशाऱ्यावरून हे फेसबुक अकाउंट बंद केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us