
भारतीय रेल्वे मोठ्या तयारीत आहे. भारतीय रेल्वेने एक सुपर APP बनवलं आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने हे APP डिजाइन केलं आहे. लोकांच्या सुविधेसाठी हे APP बनवण्यात आलं आहे. इंटरफेस आणि यूजर्स एक्सपिरियंस अधिक चांगला कसा होईल, लोकांना कसा फायदा होईल, यावर या APP मध्ये विशेष जोर दण्यात आला आहे. या APP च्या फिचर्सवर एक नजर टाकूया. या APP मध्ये युजर्सना सारखं-सारखं साइन ऑन करावं लागणार नाही. म्हणजे सिंगल साइन ऑनने सुद्धा तुम्ही सर्व सर्विस वापरु शकता. सोप्या भाषेत सांगायच झाल्यास हे ऑल इन वन APP आहे. या मध्ये तुम्हाला भारतीय रेल्वेशी संबंधित सर्व सेवांचा लाभ घेता येईल.
सध्या आरक्षित आणि अनारक्षित बुकिंगसाठी वेगवेगळे APPS आहेत. त्याशिवाय ट्रेनच्या वेळा आणि डेट लाइनसाठी सुद्धा वेगवेगळे APPS डाऊनलोड करावे लागतात. आता या सर्व सेवा एकाच APP मध्ये असतील.
काय-काय फायदे?
या APP मध्ये सर्व सेवा एकाजागी देण्यात आल्या आहेत. उदहारण म्हणून PNR शी चौकशी करताना संबंधित ट्रेनची माहिती दिली जाईल. याच्या मदतीने ऑनबोर्डिंग किंवा साइन अप करणं सोपं होईल. यूजर्स सध्याच्या RailConnect या या UTS App चे क्रेडेंशियल्स वापरुन सुपर App मध्ये सहज साइन अप करु शकतात.
अजून काय-काय आहे?
साइन अप प्रक्रिया सोपी आणि यूजर्स अनुकूल बनवण्याची काळजी या APP मध्ये घेण्यात आली आहे. त्याशिवाय लॉगिन करणं सुद्धा सोपं असेल. यूजर्स अनुभव समृद्ध करण्यासाठी यामध्ये वेगवेगळे लॉगिन ऑप्शन देण्यात आले आहेत. एकदा लॉगिन केल्यानंतर APP ला नंतर mPIN किंवा बायोमेट्रिकने सुद्धा एक्सेस करता येईल.