Us, Israel, Iran war : अमेरिकेची दादागिरी संपली; 6 देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा दणका, मित्र राष्ट्रांनीच केला मोठा गेम

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा हादरा बसला असून, अमेरिकेची दादागिरी संपुष्टात आली आहे.

Us, Israel, Iran war : अमेरिकेची दादागिरी संपली; 6 देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा दणका, मित्र राष्ट्रांनीच केला मोठा गेम
donald trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 7:29 PM

इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनी बंद केली आहे. या सामुद्रधुनीचं महत्त्व म्हणजे जागाला जेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील जवळपास 25 टक्के तेलाची वाहतूक या मार्गाने होते. तर भारताला जेवढं कच्चं तेल आणि नॅचरल गॅसची गरज आहे, त्यातील सुमारे 40 टक्के गॅसची वाहतूक ही होर्मूज स्ट्रेटमधून होते. मात्र आता इराणने हा होर्मूज स्ट्रेट बंद केल्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक जहाजं ही होर्मुज स्ट्रेटमध्ये अडकल्यानं आता अमेरिकेवर देखील दबाव वाढत आहे. दरम्यान हा होर्मुज स्ट्रेट पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सुरू व्हावा यासाठी आता अमेरिकेनं पुढाकार घेतला आहे.

मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतीक स्थरावर एक नौदल आघाडी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. होर्मुज स्ट्रेटवरील अमेरिकेची पकड आता सुटत चालली आहे. त्यामुळे ही पकड मजबूत करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांसह जगातील प्रमुख देशांना याविरोधात एक आघाडी बनवण्याचं आणि युद्धनौका पाठवण्याचं आव्हान केलं आहे. जर जगातील प्रमुख देश एकत्र आले तर आपण जगाला ऊर्जा संकटातून वाचू शकतो, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी नाटो देशांसह काही देशांना धमकी देखील दिली आहे. जर होर्मूज स्ट्रेट पुन्हा एकदा ओपन करण्यासाठी तुम्ही जर अमेरिकेची मदत केली नाही तर भविष्यात तुम्हाला फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो असं अमेरिकेनं म्हटलं आहे.

मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आवाहनानंतर देखील कोणताही देश पुढे आलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी खासकडून फ्रान्स, चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि युके ब्रिटन या देशांना या आघाडीत सहभागी होण्याचं आवाहान केलं होतं. मात्र या देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. चीनने तर सुरुवातीपासूनच इराणला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे चीन या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र दुसरीकडे दक्षिण कोरिया, फ्रान्स, जपान, आणि ब्रिटन यांनी देखील या मुद्द्यावर ट्रम्प यांना सहकार्य केलेलं नाही. चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, अशीच काहीशी भूमिका या देशांची आहे, हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या आघाडीवर अमेरिका अपयशी ठरताना दिसत आहे,  त्यामुळे ही कोंडी कोण फोडणार? याकडे आता जगाचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us