मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा धक्का, अमेरिकेचा मोठा निर्णय, अता थेट…
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, टॅरिफमुळे दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिकेनं एक मोठा निर्णय घेतल्यामुळे चिंता वाढली आहे.

भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. या टॅरिफचा दोन्ही देशांना देखील फटका बसत आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारताची अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेत काही जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून, महागाई वाढली आहे. दरम्यान अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिका आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत. एकीकडे अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे. तर दुसरीकडे आता या टॅरिफमुळे भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढली आहे, ही जवळीक आता अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय ठरत असून, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि ट्रम्प प्रशासन सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
आता अमेरिकेमधून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भारतातील अमेरिकेच्या दूतावासानं ट्विट करत थेट अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना धमकी दिली आहे, तुम्ही जर अमेरिकेमधील कायदे किंवा नियम मोडले अथवा तसा प्रयत्न केला तर तुमचा व्हिसा रद्द होऊ शकतो, तुम्हाला पुन्हा अमेरिकेतून घरी परतावं लागेल असं अमेरिकेच्या दूतावासानं म्हटलं आहे, त्यामुळे अमेरिकेच्या या भूमिकेमुळे आता अमेरिकेतली भारतीय विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
दूतावासानं नेमकं काय म्हटलं
दूतावासानं ट्विटवर पोस्ट केली आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे, तुम्ही जर अमेरिकेमधील नियम तोडण्याचा प्रयत्न केला. कायदे तोडले तर तुम्ही संकटात सापडू शकता. जर तुम्हाला अटक झाली तर तुमचा व्हिसा रद्द होईल, तुम्हाला परत भारतामध्ये पाठवलं जाईल, तसेच भविष्यात तुम्हाला अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही, त्यासाठी तुम्ही अयोग्य असाल असं अमेरिकेच्या दुतावासानं म्हटलं आहे. दरम्यान यामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताबाबत सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत, त्यामुळे देखील दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
