US-Venezuela : अमेरिकेने मादुरोंचा गेम ओव्हर करण्यासाठी वापरलं एक छोटसं शस्त्र, जगाला फारसं माहिती नसलेलं हे आयुध आहे तरी काय?
US-Venezuela : अमेरिकेने वेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांचा खेळ संपवण्यासाठी मिसाईल किंवा रॉकेट वापरलं नाही. US ने एका छोट्याशा अस्त्राचा वापर केला. त्या बद्दल जगाला अजून फार माहिती नाहीय. अमेरिकेच्या या ऑपरेशनमध्ये ज्या शस्त्राने महत्वाची भूमिका बजावली, त्या बद्दल जाणून घेऊया.

अमेरिकेने 3 जानेवारीला वेनेजुएलावर हल्ला केला. राजधानी काराकासवर हल्ला करण्यात आला. अनेक महिन्यांपासून प्लान केलेलं ऑपरेशन एब्सोल्यूट रिजॉल्व प्रत्यक्षात आणलं. या ऑपरेशन अंतर्गत अमेरिकेने वेनेजुएलाचे अपदस्थ राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेसला कैद केलं. त्यांना अटक करुन न्यू यॉर्कमध्ये आणलं. तिथे त्यांच्यावर खटला चालवला जात आहे. एका रिपोर्टनुसार अमेरिकेने मादुरो यांना पकडण्यासाठी आपल्या खूप शक्तीशाली आणि गुप्त ड्रोनचा वापर केला. न्यूजवीकनुसार, मादुरो यांच्याविरोधात कारवाईच्या मिशनसाठी कॅरेबियन क्षेत्राजवळच्या एअरबेसवर अत्याधुनिक सैन्य विमानं तैनात करण्यात आलेली. या ऑपरेशनमध्ये अमेरिकन एअरफोर्सने आरक्यू-170 सेंटिनलचा (RQ‑170 Sentinel stealth drones) सुद्धा वापर केलेला असू शकते. हे ड्रोन फार कमीवेळा दिसलय. अमेरिकेने आरक्यू-170 ड्रोनचा वापर केल्याची अजून पुष्टी केलेली नाही.
एक्सपर्ट्सनुसार, वेनेजुएला ऑपरेशनमध्ये हे ड्रोन वापरण्याची पुष्टी झाली तर अमेरिकन एअरफोर्सच्या आरक्यू-170 सेंटिनल ड्रोनसाठी एक महत्वाचा टप्पा असेल. या ड्रोन्सशी संबंधित ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली जाते. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये हे ड्रोन वापरलं होतं. गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी हे ड्रोन वापरलं होतं.
याची डिजाइन विना शेपटीची फ्लाइंग विंग
आरक्यू-170 सेंटिनल हे स्टेल्थ ड्रोन आहे. अमेरिकन एअर फोर्ससाठी वादग्रस्त क्षेत्रात गोपनीय माहिती गोळा करणं, टेहळणी आणि मिशनसाठी याचा वापर केला जातो. याची डिजाइन विना शेपटीची फ्लाइंग विंग आहे. रडराला ट्रेस होऊ नये अशी याची डिजाईन आहे. नेवादाच्या क्रीच एअर फोर्स बेसवरील 432 विंग आणि टोनोपाहची 30 वी रिकॉनिसेंस स्क्वाड्रन या ड्रोन्सच्या ऑपरेशन्सच काम पाहतात. डिफेंस न्यूज वेबसाइट द वॉर जोननुसार, वेनेजुएला ऑपरेशननंतर आरक्यू-170 सेंटिनल स्टेल्थ ड्रोन प्यूर्टो रिकोच्या अमेरिकी बेसवर उतरताना दिसलं.
दुहेरी मिशन्ससाठी वापर
आर्मी रिकग्निशन ग्रुप नावाच्या सैन्य वेबसाइटनुसार, आरक्यू-170 सेंटिनल एक सबसोनिक, जेट-इंजिनद्वारे चालणारं विमान आहे. गुपचूप गोपनीय माहिती गोळा करणं, टेहळणीसाठी ते बनवलं आहे. हे पूर्णपणे नियंत्रित सिग्नल मोडवर काम करते. त्यामुळे रडार आणि इंफ्रारेड ओळख लपवून सिग्नल आणि इलेक्ट्रॉनिक गोपनीय माहिती गोळा करतं. हे विमान मिसाइल हल्ले आणि विशेष सैन्य मोहिम जसं की मादुरोंना पकडणं अशा दुहेरी मिशन्समध्ये वापरता येतं. उंचावर उड्डाण करुन सुरक्षा सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक हालचालींची माहिती देतं.
