सुळेंच्या रिसेप्शनला अमित शाह आणि राहुल गांधी एकत्र आले आणि काय झालं?

सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे रिसेप्शन दिल्लीत झाले. या रिसेप्शनवेळी एक अशी घटना घडली, ज्यानंतर उपस्थितांनी भुवया उंचावल्या. राहुल गांधी रिसेप्शनमध्ये असतानाच तिथे अमित शाह पोहोचले. त्यानंतर काय घडले ते वाचा.

सुळेंच्या रिसेप्शनला अमित शाह आणि राहुल गांधी एकत्र आले आणि काय झालं?
Supriya Sule daughter reception
| Updated on: Aug 11, 2026 | 12:21 PM

खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे रिसेप्शन दिल्लीत पार पडले. या रिसेप्शनला पंतप्रधानांनी हजेरी लावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या रिसेप्शनला पोहोचले. या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. शरदचंद्र पवार गटातील नेते मोदी आणि अमित शाह यांचे स्वागत करताना दिसले. हेच नाही तर अमित शाह यांनी शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून गप्पा मारल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रोहित पवार आणि पवार कुटुंबातील सदस्या गप्पा मारताना दिसले. पूर्ण कुटुंबाने नरेंद्र मोदी यांच्यासोबत फॅमिली फोटोही घेतला. संसदेत अधिवेशन सुरू आहे. राहुल गांधी अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमध्ये अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

यादरम्यानच खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये अमित शाह पोहोचले. पूर्ण सुळे कुटुंबाकडून अमित शाह यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, त्यावेळी अमित शाह रिसेप्शनमध्ये पोहोचले, त्याचवेळी तिथे राहुल गांधीही उपस्थित होते. संसदेत एकमेकांवर आरोप करणारे दोन्ही नेते एकमेकांपुढे आले. राहुल गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी देखील होत्या.

अमित शाह रेवती सुळे आणि सारंग लखानी यांना भेटण्यासाठी स्टेजवर गेले, त्याचवेळी राहुल गांधी होते. राहुल गांधींना अमित शाह दिसले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अत्यंत जवळ अमित शाह राहुल गांधी आणि सोनिया गांधी उभे होते. त्यानंतर अमित शाह पुढे गेले स्टेजवर. त्यानंतर अमित शाह यांनी रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, राहुल गांधी आणि अमित शाह एकाच वेळी पोहोचल्याने चर्चांना उधाण आले.

अमित शाह यांनी पुष्पगुच्छ देत रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यातील काही नेते अमित शाह यांच्यासोबत दिसले. ठाकरे गटातून बंडखोरी करून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले खासदारही या रिसेप्शनला पोहोचले होते. पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने सर्व खासदार दिल्लीतच आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us