
“2002मध्ये वाजपेयी सरकारने पोटा कायदा आणला. त्याला विरोध काँग्रेसने केला. आमच्याकडे बहुमत नव्हतं. पोटा कायदा रोखून काँग्रेस कुणाला वाचवत होते. पोटा तर दहशतवाद्यांच्या विरोधात होता, पोटा रोखून तुम्ही व्होट बँक राखली” अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “2004 मध्ये वाजपेयींचं सरकार गेलं. मनमोहन सिंग यांचं सरकार आलं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी पोटा कायदा रद्द केला. कुणाच्या फायद्यासाठी काँग्रेसने पोटा कायदा रद्द केला? त्याचं उत्तर द्या” अशी मागणी अमित शाह यांनी केली.
“2004 च्या डिसेंबरमध्ये पोटा कायदा रद्द झाला. 2005 मध्ये अयोध्येत हल्ला झाला. मुंबईत हल्ला, डोडा उधमपूरमध्ये हिंदूंवर हल्ला, 2007 हैदराबाद स्फोट, यूपी, लखनऊत हल्ला, रामपूर सीआरपीएफ कॅम्प हल्ला, श्रीनगरमध्ये हल्ला, मुंबईत दहशतवादी हल्ला, जयपूरमध्ये हल्ला, अहमदाबादमध्ये 21 हल्ले झाले, दिल्लीत पाच स्फोट झाले, पुण्याच्या जर्मन बेकरीत हल्ला, वाराणासीत हल्ला, पुन्हा मुंबईत तीन स्फोट झाले. दहशतवादाच्या विरोधात लढाई होती. 2005 ते 2011 च्या काळात 27 दहशतवादी हल्ले झाले. हजाराच्यावर लोक मारले गेले. तुम्ही काय केलं?. मी राहुल गांधींना आव्हान दिलं. या दहशतवादी हल्ल्याबाबत यांच्या सरकारने काय केलं ते इथे उभं राहून सांगा. हे इथून पाकिस्तानाला दहशतवाद्यांचे फोटो पाठवत होते. डोजिअर पाठवले” अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्ला बोल केला.
पाकिस्तानातून त्यांना अतिरेकी पाठवावे लागत आहेत
“आमच्या काळात झालेले हल्ले पाकिस्ताना प्रेरित आणि काश्मीर सेंट्रीक हल्ले झाले. 2014 ते 2025 पर्यंत एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. हे नरेंद्र मोदी सरकार आहे. काश्मीरमध्येही आजची स्थिती आहे. पाकिस्तानातून त्यांना अतिरेकी पाठवावे लागत आहेत. काश्मीरमध्ये अतिरेकी तयार होत नाहीत” असं अमित शाह म्हणाले.
तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला विचारण्याचा?
“मी सलमान खुर्शीद यांना टीव्हीवर रडताना पाहिलं. ते सोनिया गांधींच्या घरातून बाहेर पडले. बाटला हाऊसच्या हल्ल्यामुळे सोनिया गांधी रडल्या. रडयाचं होतं तर शहीद शर्मांसाठी रडायचं होतं. तुम्ही बाटला हाऊसच्या अतिरेक्यांसाठी रडता. तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला विचारण्याचा?” असा सवाल अमित शाह यांनी विचारला.