तुटून पडा… लिट्टी चोखा ते परदेशी पदार्थ; आमदाराच्या लेकीच्या लग्नात 50 कोटींचा थाट

मोकामा आमदार अनंत सिंह यांच्या कन्या शिवांगी यांचा विवाह सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. 40 ते 50 कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या भव्य सोहळ्यात 4 लाख पाहुण्यांसाठी 10 एकरवर मंडप उभारला आहे. 150 देशी-विदेशी पदार्थांचा शाही मेन्यू हे या लग्नाचे मुख्य आकर्षण आहे. यात हजारो शेफ बिहारी व्यंजनांसह विविध पदार्थ बनवणार आहेत.

तुटून पडा... लिट्टी चोखा ते परदेशी पदार्थ; आमदाराच्या लेकीच्या लग्नात 50 कोटींचा थाट
Anant Singh
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 9:48 AM

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची कन्या शिवांगी हिच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशातील हा सर्वा मोठा विवाह सोहळा असून बिहारमधील हा ऐतिहासिक विवाह सोहळा ठरणार आहे. या विवाह सोहळ्यावर 40 ते 50 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. लग्नात काहीही कमी पडू नये म्हणून स्वत: अनंत सिंह जातीने लक्ष देत आहेत. 25 नोव्हेंबर रोजी नदवां येथे हे लग्न होणार आहे. 10 एकर जमिनीवर मोठा मंडप टाकण्यात आला आहे. हा मंडप एसी आणि वॉटर प्रुफ आहे. पाहुण्यांना कोणाताही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

या लग्नाचं सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे मेन्यू असणार आहे. या लग्न सोहळ्यात 150 देशी विदेशी पदार्थांची रेलचेल असणार आहे. यात बिहारी व्यंजनांपासून ते विदेशी व्यंजनांचा समावेश आहे. हे पदार्थ बनवण्यासाठी एक दोन नव्हे तर 1000 हून अधिक हलवाई आणि शेफ कामाला लागले आहेत. तब्बल चार लाख देशी विदेशी पाहुण्यांसाठी हे पदार्थ बनवले जात आहेत.

Loading...

काय आहे मेन्यू?

लग्नात स्टार्टर्स, मेन कोर्स आणि रॉयल डेजर्टस दिले जाणार आहेत. मिठाई, गुलाब जामून, रसगुल्ले, काजू कतली आणि बिहारचा प्रसिद्ध सिलाव खाजाही पाहुण्यांना दिला जाणार आहे. नालंदा जिल्ह्यातील सिलावचा 52 लेअरवाला खाजा हा या लग्नातील खास पदार्थ असणार आहे.

बिहारी पदार्थांची रेलचेल

या लग्नात पारंपारिक बिहारी पदार्थांची रेलचेल असणार आहे. पाहुण्यांसाठी लिट्टी चोखा, मखान्याची खीर आणि देशी तूपाने बनलेल्या मिठाई असणार आहेत. या शिवाय देशी तूपातील मालपुआ, बालूशाही, शाही कोफ्ता, कश्मिरी पुलाव आणि बिर्याणी आदी पदार्थांची रेलचेलही असणार आहे.

विदेशी डिशेज

देशी पदार्थांसोबतच कॉन्टिनेंटल, चायनीज आणि साऊथ इंडियन स्टॉलही लावले जाणार आहेत. वऱ्हाडींना जे आवडतं ते खाता यावं म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि फ्लेव्हरच्या आईस्क्रीम तसेच कुल्फी असणार आहेत. यात विदेशी आईस्क्रीमचाही समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us