वाझे-देशमुख यांची भेट झाली नाही; ना राजीनाम्याची, ना चौकशीची गरज, शरद पवारांची भूमिका

| Updated on: Mar 22, 2021 | 5:17 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड केली. (anil deshmukh did not meet sachin vaze in february, says sharad pawar)

वाझे-देशमुख यांची भेट झाली नाही; ना राजीनाम्याची, ना चौकशीची गरज, शरद पवारांची भूमिका
sharad pawar
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड केली. गृहमंत्री फेब्रुवारीच्या संबंध महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असं सिंग कशाच्या आधारावर म्हणतात? असा सवाल करतानाच वाझे-देशमुख भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा शरद पवार यांनी केला. (anil deshmukh did not meet sachin vaze in february, says sharad pawar)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रमच विशद केला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रंही त्यांनी सादर केले. सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईन चा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला.

देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही

सिंग यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तोपर्यंत सिंग गप्प का होते?

परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वाझेंना बोलवले होते असे पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर गृहमंत्री मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले असे लिहिलंय. मात्र आमची भेट मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात झाली होती, असं सांगतानाच परमबीर सिंग हे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गप्प का होते? ते आरोपासाठी महिनाभर का थांबले? असा सवाल त्यांनी केला. परमबीर सिंग यांच्या बदलीची माहिती त्यांना मिळाल्यानंतर हे आरोप केले असावेत. मला त्यात पडायचं नाही, असंही ते म्हणाले.

चौकशीचा प्रश्न आला कुठून?

अनिल देशमुख यांची चौकशी करणार का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर पवारांनी थेट यूटर्न घेतला. आता आलेल्या कागदपत्रावरून देशमुख हे मुंबईत नव्हतेच. ते नागपूरला होते आणि कोरोनावर उपचार घेत होते. त्यामुळे सिंग यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे चौकशीचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले. तसेच तरीही चौकशी करावी की करू नये हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याबाबत मी कालही बोललो होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यप्रकरण अँटालियाचं

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, परमबीर सिंग यांनी जे जे मेन्शन केलं आहे, वाझेप्रकरणात, त्याबद्दल माझं म्हणणं आहे, मुख्य केस कोणती आहे? अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी पार्क करण्याची आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुख्य केस काय आहे तर संबधीत गोष्टी अंबनीच्या घराखाली गाडीत कशा आल्या, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. गाडी कुणाची होती, कुणाच्या ताब्यात होती, कुणी वापरली आणि गाडीमालक हिरनेची हत्या कशी झाली? हे महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. (anil deshmukh did not meet sachin vaze in february, says sharad pawar)

एटीएसचा तपास योग्य दिशेने

काल एटीएसने दोघांना अटक केली आहे. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात ही अटक झाली आहे. यावरुन एक स्पष्ट होत आहे, हिरेन यांची हत्या का झाली, त्यांची हत्या करणारे जे पोलीस वाटतात, त्यांना एटीएसने अटक केली. आता तपास सत्य बाहेर येईल. उद्या-परवा कधी येईल माहिती नाही. मात्र मला आनंद आहे, मुख्य केस जे सीपींच्या आरोपानंतर दुर्लक्षित होत होती, अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांची, त्याबाबत चौकशी होत आहे. हिरेन हे त्या जीपचे मालक होते, त्यांची हत्या झाली, एटीएसने त्यामध्ये दोघांना अटक केली आहे, हिरेन केसमध्ये एटीएस करेक्ट दिशेला आहे. ही केसमधून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत होता, असंही ते म्हणाले. (anil deshmukh did not meet sachin vaze in february, says sharad pawar)

 

संबंधित बातम्या:

LIVE | परमबीर सिंग यांचे आरोप तथ्यहीन, अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही – शरद पवार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ची एन्ट्री, दया नायक ATS कार्यालयात

लोकसभेत नवनीत राणा, गिरीश बापट आक्रमक; ठाकरे सरकारच्या बचावासाठी पंजाबचा खासदार मैदानात

(anil deshmukh did not meet sachin vaze in february, says sharad pawar)