Annn Hazare : काँग्रेसचं सरकार त्यांच्या कर्तृत्वाने… आत्मचरित्रातील मजकुरावरुन अण्णा हजारेंचा सोनिया गांधींना टोला

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील मजकुरावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2014 मध्ये काँग्रेसचं सरकार त्यांच्या कर्तृत्वाने गेलं, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी अण्णांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं स्पष्ट करत आपण देशहित आणि समाजहितासाठी काम करत असल्याचंही सांगितलं.

Annn Hazare : काँग्रेसचं सरकार त्यांच्या कर्तृत्वाने... आत्मचरित्रातील मजकुरावरुन अण्णा हजारेंचा सोनिया गांधींना टोला
Anna Hazare on sonia gandhi book statement
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 11, 2026 | 5:52 PM

Anna hazare on sonia gandhi: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या आत्मचरित्रातील मजकुरावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यावेळी सोनिया गांधी यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, २०१४ साली काँग्रेसचं सरकार गेलं ते त्यांच्या कर्तृत्वाने गेलं. माझा कोणत्याही पक्षांसोबत संबंध नाही, असंही यावेळी अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. मी जे काही करतो ते देशहितासाठी आणि समाजाच्या हितासाठी करतो असंही अण्णांनी म्हटलं, ते टीव्ही९ मराठीसोबत बोलत होते.

बातमी अपडेट होत आहे….

Loading...

दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या Belonging: A Journey of Love या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाही उल्लेख केलेला आहे. त्यांनी या पुस्तकामध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाला आरएसएस आणि भाजपचा छुपा पाठिंबा होता, असा आरोप करत अण्णा पुढे कुठेच दिसले नाहीत, असंही म्हटलं आहे. सोबतच अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे आमचं सरकार गेल्याचं देखील त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. याच मजकुरावर बोलण्यासाठी अण्णा हजारे यांना टीव्ही ९ ने प्रश्न विचारला असता. काँग्रेसचं सरकार हे त्यांच्या कर्तृत्वाने गेलं आहे. त्यामध्ये माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असं स्पष्टीकरण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिउत्तर देताना दिलं आहे.

जबाबदार व्यक्तीने जबाबदारीनेच बोललं पाहिजे

पुढे बोलताना त्यांनी जबाबदार व्यक्तीने जबाबदारीनेच बोललं पाहिजे, अन्यथा स्वतःची किंमत कमी होते, असा टोला अण्णा हजारे यांनी सोनिया यांना लगवला आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us