अरविंद केजरीवाल यांचा मोठा दणका, टेन्शन वाढले, मेटाने थेट..

अरविंद केजरीवाल यांनी नुकताच गंभीर आरोप केला. याबाबतची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. अरविंद केजरीवाल यांनी थेट मेटावर आरोप केला.

अरविंद केजरीवाल यांचा मोठा दणका, टेन्शन वाढले, मेटाने थेट..
Arvind Kejriwal
| Updated on: Aug 06, 2026 | 2:17 PM

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला. थेट त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले. त्यांनी मेटावर गंभीर आरोप करत पीएम मोदी यांच्यापुढे झुकल्याचे म्हटले. अरविंद केजरीवाल यांनी E20 इंधनाच्या मुद्द्यात सरकारवर हल्लाबोल केला. हेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा काढला. अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर सोशल मिडिया पोस्ट शेअर केली. यादरम्यान त्यांनी इंस्टा अकाऊंट बंद झाल्याचा फोटोही शेअर केला. इंस्टाग्रामने त्यांचे अकाऊंट ब्लॉक केले. केजरीवाल यांनी लिहिले की, तुम्ही माझे अकाऊंट का बंद केले? तुमच्या कार्यालयाकडून माझे अकाऊंट बंद करण्यात आले. पण हे काय केले? यामागील काहीही कारण मला तुमच्याकडून सांगितले गेले नाही.

याबाबत पाठवण्यात आलेल्या ईमेलवर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. हे खूप जास्त खराब आहे. आमच्या पंतप्रधानांच्या पुढे इतके पण झुकू नका. नाही तर तुम्हाला एक दिवस भारतात फक्त त्यांचेच अकाऊंट सुरू ठेवावे लागेल, तशी परवानगी मिळेल. काहीही झाले तरीही झुकणार नसल्याचेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. अरविंद केजरीवाल यांनी E20 इंधनाच्या मुद्द्यात 100 लोकांना घेऊन नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा काढला.

दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला पाठिंबा दिला नाही. फिरोजशाह मार्गावरच त्यांचा हा मोर्चा थांबवण्यात आला. कोणत्याही परिस्थितीमध्ये विरोध कायम असेल असेही त्यांनी म्हटले. जर हे आताच थांबले नाही तर याविरोधात अजून मोठा मोर्चा काढला जाईल, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. अकाऊंट बंद झाल्यानंतर मोठा संताप व्यक्त करताना अरविंद केजरीवाल दिसले.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल यांनी सरकारविरोधात E20 इंधनाचा मुद्दा उचलून धरला. त्यांनी सोशल मीडियावर एक मोहिम सुरू केली. मात्र, त्यांच्या या आंदोलनाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मेटाने त्यांचे अकाऊंट नक्की का बंद केले हे अजून कळू शकले नाही. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्याकडून सरकारवर टीका केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us