Photo | वीज चमकली अन् 18 हत्तीवर एकाच वेळेस मरण कोसळलं, आसामची ह्रदयद्रावक बातमी

| Updated on: May 14, 2021 | 2:08 PM

आसाममधील नागाव जिल्ह्यात एक अत्यंत ह्रदयद्रावक प्रसंग घडला आहे (Elephants Died Due To Lighting Strikes). येथील जंगलात वीज पडून तब्बल 18 हत्तींचा मृत्यू झालाय.

Photo | वीज चमकली अन् 18 हत्तीवर एकाच वेळेस मरण कोसळलं, आसामची ह्रदयद्रावक बातमी
वीज पडून 18 हत्तींचा मृत्यू
Follow us on

गुवाहाटी : आसाममधील नागाव जिल्ह्यात एक अत्यंत ह्रदयद्रावक प्रसंग घडला आहे (Elephants Died Due To Lighting Strikes). येथील जंगलात वीज पडून तब्बल 18 हत्तींचा मृत्यू झालाय. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी सांगितलं की, बुधवारी रात्री काठियाटोली रेंजच्या कुंडोली वनक्षेत्रातील टेकडीवर वीज कोसळल्याने ही अप्रिय घटना घडली (Assam News 18 Elephants Died Due To Lighting Strikes In A Hilly Area In Nagaon).

elephants found dead

14 हत्तींचे मृतदेह टेकडीच्या माथ्यावर आढळले

“आमची टीम गुरुवारी दुपारी या जंगलात पोहोचली. येथे दोन कळपांमध्ये हत्तींचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यापैकी 14 हत्तींचे मृतदेह टेकडीच्या माथ्यावर आढळून आले, तर डोंगराच्या खालच्या भागात चार मृतदेह सापडले”, अशी माहिती अमित सहाय यांनी दिली.

वनमंत्री परिमल सुक्लाबैद्य घटनास्थळाची पहाणी करणार

वनमंत्री परिमल सुक्लाबैद्य म्हणाले की, या 18 हत्तींचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला असं प्राथमिक तपासणीत आढळून आलं आहे. नेमके कारण शवविच्छेदनानंतरच कळू शकेल. वनमंत्री परिमल सुक्लाबैद्य हे शुक्रवारी घटनास्थळाचा दौरा करतील.

वीज पडून 18 हत्तींचा मृत्यू

शवविच्छेदनानंतर या हत्तींच्या मृत्यूचं नेमकं कारण पुढे येईल

बुधवारी रात्री झालेल्या विजेच्या हल्ल्यामुळे हत्तींचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे, परंतु शुक्रवारी शवविच्छेदनानंतरच खऱ्या कारणाची माहिती मिळू शकेल, अशीही माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी दिली.

वीज पडून 18 हत्तींचा मृत्यू

Assam News 18 Elephants Died Due To Lighting Strikes In A Hilly Area In Nagaon

संबंधित बातम्या :

Video | माकड-वाघामध्ये जीवन मरणाचा खेळ, व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा नेमकं काय घडतंय ?

आपल्या फांदीवर बसणाऱ्या प्रत्येक पक्ष्याचा जीव घेतं हे झाड, म्हणून त्याला ‘बर्ड किलर’ म्हणतात