मोठी बातमी! मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद, पत्नी आणि मुलाचाही मृत्यू

| Updated on: Nov 13, 2021 | 4:26 PM

मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यीतल सिंघाट येथे ही घटना घडली. आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.

मोठी बातमी! मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद, पत्नी आणि मुलाचाही मृत्यू
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

नवी दिल्ली: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या तुकडीवर आयईडी हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी जवानांवर हल्ला करण्यासाठी परिसरात दबा धरून बसले होते. जवान टप्प्यात येताच त्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आसाम रायफल्सचे अनेक जवान जखमी झाले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशानं पाच धाडसी वीर गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.


मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यीतल सिंघाट येथे ही घटना घडली. आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये कमांडिंग ऑफिसर त्याची पत्नी, मुलगा  , शीघ्र कृतीदलाचे जवान होते. कमांडिंग ऑफिसर सह आसाम रायफल्सचे चार जवान आणि कमांडिंग ऑफिसरच्या पत्नीचा आणि मुलाचा  मृत्यू झालाय, अशी माहिती आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणी ट्विट केलं आहे. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर करण्यात आलेला भ्याड हल्ला हा दुखद आणि निंदनीय आहे. संपूर्ण देशानं कमांडिंग ऑफिसर आणि त्याच्या परिवारातील दोन सदस्य आणि 5 जवांनाना गमावलं आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट

सर्च ऑपरेशनला सुरुवात

दरम्यान, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आता जवानांकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.

पीपल्स लिबरेशन ऑफ मणिपूरचा हात?

पीपल्स लिबरेशन ऑफ मणिपूर संघटनेचा हात असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्याप अधिकृतीरित्या कुठल्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मणिपूरमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली होती. भारत सरकारनं या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. ही संघटना भारतीय सुरक्षा दलांवर हलेल करते. या संघटनेची स्थापना बिश्वेवर सिंह यांनी केली होती.

इतर बातम्या:


मणिपूरमध्ये सैनिकांच्या तुकडीवर हल्ला; अनेक जवान जखमी

Goa Election 2022 : मागच्या वेळेस गडकरी, ह्या वेळेस फडणवीस, गोव्यात ‘कमाल’ करणार? भाजपचा मास्टरप्लॅन काय?