‘अलकायदा’ प्रकरणी 3 मदरशांवर बुलडोजर; 37 जणांना अटक; दहशतवाद्यांबरोबर संबंध असल्याने अनेकांना ताब्यात

| Updated on: Aug 31, 2022 | 12:26 PM

आसामच्या बारपेटा जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी जिल्ह्यातील ढकलियापारा भागात शेखुल हिंद महमुदुल हसन जमीउल हुदा नावाचा मदरसाही पाडण्यात आला होता. या तपासात मदरशाचे अल-कायदा इंडियन सबकॉन्टिनेंट आणि बांगलादेशस्थित दहशतवादी गट अन्सारुल बांग्ला टीम यांच्याशी संबंध असल्याचे आढळून आले होते, त्याप्रकरणी मदरशावर बुलडोझर चालवण्यात आला होता.

अलकायदा प्रकरणी 3 मदरशांवर बुलडोजर; 37 जणांना अटक; दहशतवाद्यांबरोबर संबंध असल्याने अनेकांना ताब्यात
Follow us on

नवी दिल्लीः आसाममधील (Assam) मदरशावर दहशतवाद्यांबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून कारवाई सुरू करण्यात आली आहे. बोंगाईगाव जिल्ह्यातील (Bongaigaon District) कबितारीतील मरकजुल मा-आरिफ क्वारियाना मदरशावर (Markazul Ma-Arif Quariana Madrasa in Kabitari demolished) बुधवारी कारवाई करण्यात आली आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेबरोबर संबंध असल्याप्रकरणी इमाम आणि मदरसा शिक्षकांसह 37 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आसाम सरकारकडून कारवाई करण्यात आलेला हा तिसरा मदरसा असल्याचे सांगण्यात येत आहे. आसाममध्ये आठवडाभरात दुसऱ्या मदरशावर कारवाई करण्यात आल्याने प्रचंड मोठी खळबळ माजली आहे. हा मदरसा पाडण्यापूर्वी मंगळवारी रात्री तो रिकामा करण्यात आला होता, त्यानंतर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये पाठवण्यात आले आहे. या मदरशावर कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी या मदरशाची चौकशी केली असता त्यांना बंदी घातलेल्या संघटनेतील काही व्यक्तींबरोबर संबंधित असलेली कागदपत्रे सापडली होती.

 

या मदरशाचे संबंध हाफिजूर रहमानशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असून काही दिवसांपूर्वी येथील एका व्यक्तीला दहशतवादी संघटनेबरोबर संबंध असल्याचे कारण देऊन अटक करण्यात आली होती.

बारपेटातील मदरसाही जमीनदोस्त

आसामच्या बारपेटा जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी जिल्ह्यातील ढकलियापारा भागात शेखुल हिंद महमुदुल हसन जमीउल हुदा नावाचा मदरसाही पाडण्यात आला होता. या तपासात मदरशाचे अल-कायदा इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) आणि बांगलादेशस्थित दहशतवादी गट अन्सारुल बांग्ला टीम (ABT) यांच्याशी संबंध असल्याचे आढळून आले होते, त्याप्रकरणी मदरशावर बुलडोझर चालवण्यात आला होता.

सरकारी जमिनीवर बांधकाम

याप्रकरणी सांगण्यात आले की, हा मदरसा सरकारी जमिनीवर बांधण्यात आला होता, त्यामुळे प्रशासनाकडून पाडण्यात आला आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांकडून थेट कारवाई

यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, राज्यातील मदरशांचा वापर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र म्हणून केला जात आहे. त्यांना शिक्षणाच्या नावाखाली दहशतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यात असे मदरसे उद्ध्वस्त केले जात आहेत. मदरशात अल कायदाचे प्रशिक्षण शिबिर सुरू असल्याचे तपासात समोर आले असून या प्रकरणी संबंधितांबर कडक कारवाई करण्यात येणार असून अजून असे काही मदरसे असतील तर त्यांच्यावरही कुऱ्हाड चालवली जाईल असंही त्यांनी सांगितले.