AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu Election Exit Poll Results 2026 : सुपरस्टार अभिनेत्याला सर्वात मोठा हादरा, भाजपचंही स्वप्न भंगल; तामिळनाडूच्या एक्झिट पोलच्या आकड्याने उडवली झोप

Tamil Nadu Election Exit Poll, Tamil Nadu Assembly Election Exit Poll, Tamil Nadu Exit Poll Results, Tamil Nadu Exit Poll Results 2026, Tamil Nadu Exit Poll, तमिळनाडू निवडणूक एक्झिट पोल, तमिळनाडू विधानसभा निवडणूक एक्झिट पोल, तमिळनाडू एक्झिट पोल निकाल, तमिळनाडू एक्झिट पोल निकाल 2026, तमिळनाडू एक्झिट पोल

Tamil Nadu Election Exit Poll Results 2026 : सुपरस्टार अभिनेत्याला सर्वात मोठा हादरा, भाजपचंही स्वप्न भंगल; तामिळनाडूच्या एक्झिट पोलच्या आकड्याने उडवली झोप
Tamil nadu Exit PollImage Credit source: Google
| Updated on: Apr 29, 2026 | 7:13 PM
Share

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अलिकडेच मतदान पार पडले होते. सत्ताधारी DMK पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी इच्छुक आहे, तर तर दुसरीकडे AIDMK आणि भाजपची युती, तसेच अभिनेता थलपथी विजयच्या TVK हे पक्ष DMK ला रोखण्याचा प्रयत्न करत होते. 234 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. अशातच आता या निवडणुकीचे आकडे समोर आले आहेत. यात थलपती विजयला मोठा धक्का बसला आहे, तसेच भाजपचंही सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तामिळनाडूमध्ये स्टॅलिन सत्ता राखणार

मॅट्रिक्झच्या एक्झिट पोलनुसार, सत्ताधारी DMK आणि मित्रपक्षांना 122 ते 132 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच भाजप आणि AIDMK यांच्या युतीला 87 ते 110 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर थलपती विजयच्या TVK पक्षाला 10 ते 12 आणि इतरांना 0 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. याचात अर्थ तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे सत्ता राखण्यात यशस्वी ठरले आहेत. तसेच भाजपचं सत्ता मिळवण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. त्याचबरोबर थलपती विजयलाही मोठा हादरा बसल्याचे समोर आले आहे.

पीपल्स प्लसचा एक्झिट पोल काय?

पीपल्स प्लसच्या एक्झिट पोलनुसार DMK आणि मित्रपक्षांना 125 ते 145 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच एआयएडीएमके भाजपला 65 ते 80 तसेच टीव्हीकेला 18 ते 24 जागा मिळण्याची शक्यता आहेत. तसेच इतरांनी 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्टॅलिन हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण 234 आमदार असलेल्या तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे. डीएमके हा बहुमताचा आकडा सहज गाठण्याची शक्यता आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा?

पीपल्स इनसाइटच्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये डीएमके आणि मित्रपक्षांना 120 ते 140 जागा, एडिएमके आणि मित्रपक्षांना 60 ते 70 जागा आणि टीव्हीकेला 30 ते 40 जागा मिळू शकतात. इतरांना 0 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये सत्ताबदल होण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....