AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exit Poll Results 2026 : मोठी बातमी! पश्चिम बंगालसह 5 राज्यांचे एक्झिट पोल समोर, मोठा उलटफेर, जनतेचा कौल काय?

5 State Assembly Election Exit Poll Results 2026 in Marathi : मोठी बातमी समोर येत आहे, आज अखेर पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मतदान संपताच पश्चिम बंगालसह, आसाम, केरळ, तामिळनाडू , आणि पुदुच्चेरी राज्यातील एक्झिट पोल आता समोर आले आहेत.

Exit Poll Results 2026 : मोठी बातमी! पश्चिम बंगालसह 5 राज्यांचे एक्झिट पोल समोर, मोठा उलटफेर, जनतेचा कौल काय?
5 State Assembly Election Exit PollImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 29, 2026 | 7:03 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. आज पश्चिम बंगाल विधानसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे.  पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान होताच आता 5 ही राज्यांचे एक्झिट पोल हाती आले आहेत. मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपला 146 ते 161 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर तृणमुल काँग्रेसला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप मॅजिक फिगर गाठेल असा अंदाज आहे.  तर या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येताना दिसत आहे.

चाणक्यचा एक्झिट पोल देखील आता समोर आला आहे. चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 130 – 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर पोल डायरीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अवघ्या 99 ते 127 जागंवरच समाधान मानावं लागणार आहे. तर भाजपला 142 ते 171 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आसाममध्ये काय स्थिती? 

आसाममध्ये पुन्हा एकदा एनीडीएची सत्ता येताना दिसत आहे. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर काँग्रेसला 24 ते 36 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. याचा अर्थ एक्झिट पोलच्या अंदानुसार भाजप पुन्हा एकदा आसाममध्ये आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार आहे.

केरळमध्ये धक्कादायक निकाल 

केरळमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार केरळमध्ये डाव्या पक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये एलडीएफला 49 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेस आघाडीला  78 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये भाजपच्या वाट्याला अवघ्या तीन जागा येण्याची शक्यता आहे. एक्सिस माय इंडियाचा हा एक्झिट पोल आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था