इराणमधील महिला कितव्या वर्षी पहिल्यांदा मुलाला जन्म देतात? फर्टिलिटी रेट काय? सगळंच चक्रावून टाकणारं

सध्या युद्धामुळे इराण चांगलंच चर्चेमध्ये आलं आहे, केवळ इराणच नाही तर तिथे महिलांना असलेलं स्थान, महिलांबाबतचे तेथील सरकारचे धोरणं, इराणची संस्कृती या गोष्टी देखील चर्चेमध्ये आल्या आहेत.

इराणमधील महिला कितव्या वर्षी पहिल्यांदा मुलाला जन्म देतात? फर्टिलिटी रेट काय? सगळंच चक्रावून टाकणारं
Iran birth rate
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 09, 2026 | 6:35 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून, इराण चांगलंच चर्चेत आलं आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. युद्धामुळे इराणसोबतच इराणमधील संस्कृती, तेथील रहाणीमान, समाज आणि एवढंच नाही तर देशात महिलांना असणारं स्थान देखील चांगलंच चर्चेमध्ये आहे. या युद्धादरम्यान अनेकांकडून असा देखील एक प्रश्न विचारण्यात येत आहे की, इराणमध्ये मुली कितव्या वर्षी आई बनतात तसेच तेथील फर्टिलिटी रेट काय आहे? दरम्यान आता या संदर्भात सरकारी आकडेवारी समोर आली आहे.

इराणमध्ये महिलांची स्थिती म्हणावी तेवढी चांगली नाहीये, इराणमध्ये महिलांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहेत. तसेच समजा एखाद्या महिलेनं कायद्याचं उल्लंघन केलं तर तेथील पोलीस या महिलेला कडक शिक्षा देतात. अनेकदा सरकारच्या या धोरणाविरोधात इराणमध्ये मोठी आंदोलन देखील झाली, मात्र ही आंदोलन दडपून टाकण्यात आली, त्याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. मात्र इराणमध्ये महिलांविरोधात एवढं कडक धोरण असताना देखील इराणची लोकसंख्या आणि मुलांना जन्माला घालायचा येथील महिलांचा दर हे एक वेगळं चित्र दाखवतात.

एका रिपोर्टनुसार इराणमध्ये सर्व सामान्यपणे महिला 25 ते 29 वयामध्ये आपल्या पहिला मुलाला जन्म देतात. सरकारी आकडेवारीनुसार तब्बल 87 टक्के महिला या याच वयात आपल्या पहिल्या मुलाला जन्म देतात. तेहरान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार 2024 मध्ये एका कॅलेंडर वर्षामध्ये पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांचं वय सरासरी हे 27.4 वर्ष एवढं नोंदवण्यात आलं होतं. त्यानंतर 2025 साली यामध्ये वाढ होऊन पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांचं वय सरासरी हे 27.4 वर्षांहून 27.7 वर्ष एवढं झालं. याचाच अर्थ असा की आता इराणमध्ये हळुहळु पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांचं वय वाढत आहे. शिक्षण, शहरीकरण आणि रोजगार या सर्वांचा परिणाम तेथील जन्मदरावर होत आहे. फर्टिलिटी रेटबाबत बोलायचं झाल्यास इराणमधील फर्टिलिटी रेट 2.08 मुलं प्रति महिला एवढा आहे.

 

Follow Us