गोमांस तस्करीच्या संशयावरुन तीन आदिवासींना लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण, मारहाणीत दोघांचा मृत्यू, बजंरग दलावर आरोप

| Updated on: May 03, 2022 | 10:25 PM

सिवनीमध्ये मंगळवारी मॉब लिचिंगचा प्रकार समोर आला आहे

गोमांस तस्करीच्या संशयावरुन तीन आदिवासींना लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण, मारहाणीत दोघांचा मृत्यू, बजंरग दलावर आरोप
MP mob lynching
Image Credit source: twitter
Follow us on

सिवनी, मध्यप्रदेशमध्य प्रदेशात सिवनीमध्ये मंगळवारी मॉब लिचिंगचा (Mob lynching)आणखी एक प्रकार समोर आला आहे. गोमांस तस्करीच्या संशयावरुन जमावाने तीन आदिवासींना लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाणीचा प्रकार घडला आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दोन तरुणांच्या मृत्यूच्या घटनेचं वृत्त कळताच सातपलेल्या आदिवासी तरुणांनी जबलपूर-नागपूर (Jabalpur-Nagpur)महामार्गावर रास्तारोको आंदोनही केलं. हे सर्व प्रकरण कुरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. दोन आदिवासींची हत्या आणि रास्तारोको आंदोलनानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरई गावातील रहिवासी सगार आणि सिमरीया गावातील धानशाह आणि संपत बट्टी या तिघांना जमावाने लाठ्यांनी जबर मारहाण केली. मारहाण करणारे बजरंग दलाचे (Bajrang Dal)कार्यकर्ते होते, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
हा सर्व प्रकार समजल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला. बरघाटचे काँग्रेसचे आमदार अर्जुनसिंह काकोडिया हेही घटनास्थळी पोहचले. त्यांनी संतापलेल्या गावकऱ्यांसोबत रास्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवला. आरोपी हे बजरंग दलाचे कार्यकर्ते असलव्याचा आरोपही आमदारांनी केला. आरोपींना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

MP mob lunching

घटनास्थळी १२ किलो मास सापडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी १२ किलो मास जप्त करण्यात आले. हे मास पोलिसांनी जप्त केले असून, फॉरेन्सिक तपासणीसाठी ते पाठवण्यात आले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाला जंगलराज असल्याचे संबोधत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लक्ष्य केले आहे.

MP mob lunching 2

कमलनाथ यांनी तीन आमदारांची समिती केली स्थापित

मध्यप्रदेश काँग्रेसने ही घटना अत्यंत गांभिर्याने घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी ही घटना अत्यंत दुखद असल्याचे सांगितले आहे. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून तीन आमदारांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहितीही कमलनाथ यांनी दिली आहे. ही समिती घटनास्थळी जाऊन मृतांच्या नातेवाईकांना भेटणार आहे. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल प्रदेश काँग्रेस समितीला सादर करण्यात येणार असल्याची माहितीही कमलनाथ यांनी दिली आहे. या समितीत आदिवासी भागातील ओकारसिंह मरकाम. अशोक मर्सकोले आणि नारायण पट्टा या आमदारांचा समावेश आहे.