AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशींना प्रवेश मिळणार नाही, हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आसामच्या हॉटेल मालकांचा निर्णय

बांगलादेशमध्ये इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्णा दास यांना अटकेनंतर अल्पसंख्याक समुदायावरील अत्याचारात वाढ झाली आहे. वाढत्या अत्याचाराविरोधात भारतात देखील निदर्शने केली जात आहेत. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही बांगलादेशींना हॉटेलमध्ये राहू दिले जाणार नाही आणि कोणतीही मदत केली जाणार नाही, असा निर्णय आसामच्या बराक व्हॅली हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने घेतला आहे.

बांगलादेशींना प्रवेश मिळणार नाही, हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आसामच्या हॉटेल मालकांचा निर्णय
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 07, 2024 | 11:40 PM
Share

बांगलादेशातील परिस्थिती काय आहे हे सध्या संपूर्ण जगाला माहित आहे. येथे अल्पसंख्याकांना कसे लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या आसाममधील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाल्याचे चित्र समोर आले. आता बराक व्हॅलीमधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये बांगलादेशी ग्राहकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत हिंदू समाजातील लोकांवर होणारे हल्ले थांबत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही बांगलादेशींना मदत केली जाणार नाही, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

बराक व्हॅली प्रदेशात कचर, श्रीभूमी (पूर्वीचे करीमगंज) आणि हैलाकांडी या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. ही दरी बांगलादेशच्या सिल्हेट प्रदेशाशी १२९ किमी लांबीची सीमा सामायिक करते. हॉटेल आणि रेस्टॉरंटवर बंदी घालण्यापूर्वी श्रीभूमी जिल्ह्यातील आयात-निर्यात असोसिएशनने बांगलादेशसोबतचे सर्व व्यापारी संबंध स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय.

बराक व्हॅली हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबुल राय म्हणाले की, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांची परिस्थिती चिंताजनक आहे. हे आम्ही स्वीकारू शकत नाही. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांमध्ये शेजारील देशातील एकाही नागरिकाला परवानगी दिली जाणार नाही. आमचा निषेध व्यक्त करण्याचा हा प्रकार आहे. ते म्हणाले की, बांगलादेशच्या जनतेने देशात स्थिरता परत येईल याची खात्री करावी. परिस्थिती सुधारली तरच आम्ही आमच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो.

अलीकडेच त्रिपुरामध्ये ऑल त्रिपुरा हॉटेल आणि रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनने बांगलादेशी लोकांना रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्यास नकार दिला होता. हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. शेजारील देशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बांगलादेशातील कोणत्याही रुग्णावर उपचार करणार नसल्याची घोषणा यापूर्वी आयएलएस रुग्णालयाने केली होती.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच