Bank Holidays in October: ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बँका बंद राहतील, तुमच्या शहरात कोणत्या दिवशी सुट्टी?

RBI च्या हॉलिडे कॅलेंडरनुसार ऑक्टोबर महिन्यात बँका जवळपास 15 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास या तारखा माहित करुन घ्या आणि त्यानुसार तुमचे काम वेळेवर पूर्ण करा.

Bank Holidays in October: ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बँका बंद राहतील, तुमच्या शहरात कोणत्या दिवशी सुट्टी?
| Updated on: Sep 24, 2024 | 6:46 PM

ऑक्टोबर महिन्यात अनेक सण येत आहेत. गांधी जयंती पासून ते दसऱ्यापर्यंत अनेक मोठे सण या महिन्यात येतील. त्यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्ट्याही असतील. RBI च्या हॉलिडे कॅलेंडरनुसार ऑक्टोबर महिन्यात बँका जवळपास 15 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर ते वेळेत करुन घ्या. तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सुट्ट्यांचे दिवस माहित असायला हवेत. अन्यथा तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

बँका केव्हा आणि कुठे बंद होतील?

1 ऑक्टोबर (मंगळवार) : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने सुट्टी
२ ऑक्टोबर (बुधवार): गांधी जयंती
३ ऑक्टोबर (गुरुवार): शारदीय नवरात्रीची सुरुवात आणि महाराजा अग्रसेन जयंती.
६ ऑक्टोबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी
10 ऑक्टोबर (गुरुवार): महासप्तमी
11 ऑक्टोबर (शुक्रवार): महानवमी
12 ऑक्टोबर (शनिवार): दसरा आणि दुसरा शनिवार
13 ऑक्टोबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी
14 ऑक्टोबर (सोमवार): दुर्गा पूजा (दसैन), गंगटोक (सिक्कीम)
16 ऑक्टोबर (बुधवार): लक्ष्मी पूजा (अगरताळा, कोलकाता)
17 ऑक्टोबर (गुरुवार): वाल्मिकी जयंती
20 ऑक्टोबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी
26 ऑक्टोबर (शनिवार): प्रवेश दिवस (जम्मू आणि काश्मीर) आणि चौथा शनिवार
27 ऑक्टोबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी
३१ ऑक्टोबर (गुरुवार): नरक चतुर्दशी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन आणि दिवाळी.

बँकांच्या सुट्ट्यांची यादी सर्व राज्यांमध्ये वेगवेगळी असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी सारखी नसते.  या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआय आपल्या अधिकृत वेबसाइटवर देत असते.वेगवेगळ्या राज्यात तेथील स्थानिक सणांच्या हिशोबाने या सुट्टी जाहीर केल्या जातात. पण बँका बंद असल्या तरी जे लोकं ऑनलाईन सेवा वापरतात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने तुम्ही आपले कामे पूर्ण करू शकतात. बँकेच्या बहुतांश सेवा आता ऑनलाईन झाल्या आहेत. भारतात ऑनलाईन सेवा वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तुम्ही घरबसल्या बँकिंग सेवेशी संबंधित काम करु शकता. तुमचे कोणतेही काम असेल ज्यासाठी बँकेत जाणे आवश्यक असेल तर ते वेळेवर पूर्ण करुन घ्या.