Bank Strike : बँक युनियन्सची मोठी घोषणा, या तारखेआधी बँकेशी संबंधित काम उरकून घ्या, अन्यथा…

Bank Strike : कॅश डिपॉझिट, विथड्रॉ, चेक क्लियरेन्स आणि शाखांशी संबंधित सेवा प्रभावित होऊ शकतात. म्हणून ग्राहकांना बँकांशी संबंधित काम आधीच करुन घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Bank Strike : बँक युनियन्सची मोठी घोषणा, या तारखेआधी बँकेशी संबंधित काम उरकून घ्या, अन्यथा...
bank unions
Image Credit source: Sonu Mehta/HT via Getty Images
| Updated on: Jan 05, 2026 | 9:36 AM

Bank Strike : संपूर्ण देशातील बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक कर्मचारी युनियनने 27 जानेवारीला देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) नेतृत्वाखाली बँक कर्मचारी युनियनची पाच दिवसांचा आठवडा करण्याची मुख्य मागणी आहे. संप झालाच तर सलग तीन दिवस बँकेच कामकाज प्रभावति होईल. 25 आणि 26 जानेवारीला आधीच सुट्टी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी बँकेशी संबंधित कामं आधीच उरकून घ्यावीत.

पाच दिवसांची वर्किंग सिस्टिम लागू करण्यावर आधीच सहमती झालीय असं बँक कर्मचारी युनियनचं म्हणणं आहे. मार्च 2024 मध्ये वेतन कराराच्यावेळी हा निर्णय झालेला. मात्र, तरीही सरकार आणि व्यवस्थापनाकडून या बद्दल कुठलही ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही. आमची मागणी योग्य आहे, असं युनियन्सच म्हणणं आहे. त्यासाठी आता संपाचा मार्ग निवडण्यात आलाय.

मग, कामाचे तास कसे मॅनेज करणार?

सध्या बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. युनियनची मागणी आहे की, उरलेले दोन शनिवारही सुट्टी जाहीर करावी. त्यासाठी कर्मचारी सोमवार ते शुक्रवार अतिरिक्त वेळ थांबून काम करायला तयार आहेत. यामुळे कामांच्या तासांमध्ये काही बदल होणार नाही असं युनियनच म्हणणं आहे. काम अजून व्यवस्थित होईल असा युनियन्सचा दावा आहे.

अशा बदलासाठी पूर्णपणे तयार

आरबीआय, एलआयसी आणि जीआयसी आधीपासूनच पाच दिवस काम करत आहेत. शेअर बाजार आणि परदेशी मुद्रा बाजार ही शनिवारी बंद असतो. केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालयं सुद्धा शनिवारी बंद असतात. अशावेळी फक्त बँकांना वेगळं ठेवणं योग्य नाही, असा युनियनचा तर्क आहे. बँकिंग सेक्टरही अशा बदलासाठी पूर्णपणे तयार आहे असं युनियनच म्हणणं आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होईल?

27 जानेवारीला संप झाल्यास सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच कामकाज ठप्प होऊ शकतं. कॅश डिपॉझिट, विथड्रॉ, चेक क्लियरेन्स आणि शाखांशी संबंधित सेवा प्रभावित होऊ शकतात. सलग तीन दिवस बँका बंद राहिल्याने सर्वसामान्यांना अडचणी येऊ शकतात. म्हणून ग्राहकांना बँकांशी संबंधित काम आधीच करुन घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.