‘वंदे मातरम’च्या अवमानावरून बंकिमचंद्र यांचे वंशज संतप्त, सोनिया गांधींना लिहिले खरमरीत पत्र

'वंदे मातरम' गीताचे जनक असलेल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे थेट वंशज आणि पश्चिम बंगालमधील नळहाटी मतदारसंघाचे आमदार असलेल्या सुमित्रो चॅटर्जी यांनी सोनिया गांधी यांना खरमरीत पत्र लिहून वंदेमातरम गीताच्या अवमानाप्रकरणी जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

वंदे मातरमच्या अवमानावरून बंकिमचंद्र यांचे वंशज संतप्त, सोनिया गांधींना लिहिले खरमरीत पत्र
Letter from Bankim Chandra Chattopadhyay's direct descendant to Sonia Gandhi.
| Updated on: Aug 16, 2026 | 9:25 PM

‘वंदे मातरम’चे संपूर्ण गायन १५ ऑगस्टला देशभरात झाले असताना काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) मुख्यालयात ध्वजारोहना दरम्यान या गीताला दाखवलेली नापसंती,असहजा आणि हातवारे करीत गीत थांबवण्याचा वारंवार केलेला प्रयत्न अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे, असे पत्रच वंदेमातरम गीताचे जनक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंशज आमदार सुमित्रो चॅटर्जी यांनी सोनिया गांधी यांना लिहिले आहे.

पश्चिम बंगालमधील नळहाटी मतदारसंघाचे आमदार असलेल्या सुमित्रो चॅटर्जी यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक खरमरीत पत्र लिहून ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताच्या अवमानाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. १५ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) मुख्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’चे पूर्ण स्वरूपात गायन केले जात होते. या गायनादरम्यान सोनिया गांधी यांनी दर्शवलेली असहजता,नापसंती आणि गाणे थांबवण्याचा केलेला वारंवार प्रयत्न अत्यंत खेदजनक आणि दुर्देवी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कुटुंबाचे थेट वंशज असणाऱ्या आमदार चॅटर्जी यांनी पत्रात लिहिले की, हे वर्तन लाखो देशभक्त आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचा अवमान करणारे आहे. त्यांनी पत्रात ‘वंदे मातरम’चा ऐतिहासिक संदर्भ देत नमूद केले की, १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले हे गीत, १९०५ च्या बंगभंग आंदोलनातील परवलीचा शब्द, १९०९ मध्ये लोकमान्य टिळकांच्या राजद्रोहाच्या खटल्यादरम्यान गुंजलेला नारा आणि खुदीराम बोस यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते.

विशेष म्हणजे या वंदेमारतम गीताचा अर्धा भाग बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी १९३७ मध्ये केलेल्या विरोधानंतर काँग्रेस सरकारने वगळून आधी मोठे पाप केले होते. आता ती चूक सुधारण्याची संधी त्यांनी मतांसाठी वाया घालवली आहे. तसेच बंगाल येथील काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या पश्चिम बंगाल छात्र परिषद यांचा नाराच मोदेर संजीवन-वंदे मातरम असा आहे. ज्याला संघटना अभिमानाने गाते. त्या संघटनचे शीर्षस्थ नेतृत्व या गीताबद्दल इतके असहज का ? असा सवालच बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी केली आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहात ‘वंदे मातरम’ चा पूर्ण सन्मान केला जात असताना, काँग्रेस मुख्यालयात मात्र सर्वोच्च नेतृत्वाकडून या गीताला असा विरोध होणे हा एक मोठा विरोधाभास आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘वंदे मातरम’ ही कोण्या एका राजकीय पक्षाची वैयक्तिक संपत्ती नसून संपूर्ण देशाचा वारसा आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी आपल्या या वर्तनाबद्दल आत्मपरीक्षण करून देशवासीयांची, विशेषतः पश्चिम बंगालच्या जनतेची बिनशर्त माफी मागावी, अशी जोरदार मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us