पुढील महिन्यात 29 पैकी 11 दिवस बँका बंद, वेळीच व्यवहार पूर्ण करा अन्यथा… पाहा ही यादी…

फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँका बंद रहाणार आहेत. यादिवशी कोणतेही बँकेतील कोणतेही काम होणार नाही. त्यामुळे जे काही व्यवहार करायचे असतील ते वेळीच करून घ्या. अन्यथा पस्तावण्याची वेळ येऊ शकते.

पुढील महिन्यात 29 पैकी 11 दिवस बँका बंद, वेळीच व्यवहार पूर्ण करा अन्यथा... पाहा ही यादी...
RBI BANK HOLIDAY
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 27, 2024 | 9:04 PM

नवी दिल्ली | 27 जानेवारी 2024 : नव्या वर्षाचा पहिला महिना संपत आला आहे. चार दिवसांनी नवा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये देशातील बँकांना भरपूर सुट्ट्या असणार आहेत. या महिन्यात 29 दिवस आहेत त्यापैकी 11 दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्या असतात. त्याव्यतिरिक्त अनेक सण आणि काही महत्त्वाच्या दिवसांमुळे बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत पुढच्या महिन्यात काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर आधी सुट्ट्यांची ही यादी तपासा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक प्रत्येक कॅलेंडर वर्षात बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. यंदाचे वर्ष हे लीप वर्ष आहे. साधारणतः वर्षाचे 365 दिवस असतात. मात्र, लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक दिवस वाढतो. म्हणजेच हा महिना 29 दिवसांचा असतो.

फेब्रुवारी महिन्यातील या 29 दिवसांपैकी 11 दिवस बँका बंद रहाणार आहेत. रिझर्व्ह बँकेने त्याची यादी जाहीर केली आहे. RBI ने जाहीर केलेल्या सुट्टीच्या यादीतील अनेक सुट्ट्या या राष्ट्रीय स्तराच्या आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. तर, काही सुट्ट्या या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तरावरच्या आहेत. त्या दिवशी त्या त्या राज्यातील बँकेच्या शाखा बंद असतात.

अनेकवेळा बँकेला सुटी असल्याने महत्त्वाची कामे रखडतात. पण, आता अनेक बँकांनी ऑनलाइन सेवा देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे फारशी अडचण निर्माण होणार नाही. मोबाईल किंवा नेट बँकिंगद्वारेही व्यवहार करू शकणारा आहात. बँकांच्या ऑनलाइन सेवा सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. त्यामुळे नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI द्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करू शकणार आहात.

या दिवशी असणार बँका बंद

4 फेब्रुवारी 2024 – रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील.

10 फेब्रुवारी 2024 – महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी

11 फेब्रुवारी 2024 – रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद.

14 फेब्रुवारी 2024 – बसंत पंचमी आणि सरस्वती पूजा यामुळे आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद राहतील.

15 फेब्रुवारी 2024 – मणिपूर राज्यात लुई नगई नी या सणामुळे बँकेतील काम बंद असेल.

18 फेब्रुवारी 2024 – रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

19 फेब्रुवारी 2024 – छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद राहतील.

20 फेब्रुवारी 2024 – राज्य दिनानिमित्त आयझॉल आणि इटानगरमध्ये बँका बंद असतील.

24 फेब्रुवारी 2024 – दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

25 फेब्रुवारी 2024 – रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.

26 फेब्रुवारी 2024 – नायकुममुळे इटानगर, झारखंडमधील बँकांना सुट्टी असेल.