कामगारांना दिवाळीची दिली मोठी सुटी, बनले ‘फेव्हरेट बॉस’, आता नोकरीसाठी उमेदवारांची लागली रांग
एका डिजिटल मार्केटिंग स्टार्टअप 'फीडबॉक्स'चे को-फाऊंडर यश कुलश्रेष्ठ यांनी लिंक्डइनवर त्यांच्या कंपनीच्या दिवाळी हॉलिडे कॅलेंडर शेअर केले आणि ते प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आजच्या युगात कॉर्पोरेट जगतातील कामाचे तास, कठोर ऑफीस रुल्स आणि वर्क – लाईफ बॅलेन्सची कमतरता यावरुन सतत चर्चा होत असते. या काळात इंदौर येथील एका छोट्या स्टार्टअपने टॅलेंटना आकर्षित करण्यासाठी एक अनोखी आणि हृदय जिंकणारी पद्धत शोधून काढली आहे. हा प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासासाठी आणि आनंदासाठी संपूर्ण वेळ देणे.
ही कहानी मध्य प्रदेशातील इंदौरच्या डिजिटल मार्केटिंग एजन्सी ‘फीडबॉक्स’ची आहे.कंपनीचे को-फाऊंडर यश कुलश्रेष्ठ याने अलिकडेच लिंक्डइनवर आपल्या ऑफीसचे दिवाळी हॉलिडे कॅलेंडर शेअर केले. मग काय, ही पोस्ट वाचताच सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. केवळ २४ तासात कंपनीकडे २५० हून जास्त जॉब एप्लीकेशनचा पुर आला आहेत.
काय होते या हॉलिडे कॅलेंडरमध्ये खास?
4 नोव्हेंबर: ऑफिसमध्ये मिठाई आणि गिफ्ट्सचे वितरण
5 आणि 6 नोव्हेंबर : घरातून काम ( Work From Home) करण्याची सुविधा
दीर्घ सुट्ट्या आणि अर्धा दिवसाचा ब्रेक – म्हणजे कर्मचारी कोणत्याही घाई शिवाय आप-आपल्या होमटाऊनला जाऊ शकतील आणि सणाचा संपूर्ण आनंद घेऊन ११ नोव्हेंबरला पुन्हा ऑफीसला येऊ शकतील. याशिवाय कर्मचाऱ्यांना ही देखील सूट दिली आहे की ते कुटुंबियासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी आपल्या सुट्ट्या पुढे वाढवू शकतील.
यश कुलश्रेष्ठ यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये याचे कारण सांगताना लिहीले की, जवळपास आमची सर्व टीम ज्यात मी आणि आयुषी देखील सामील आहे, इंदौरच्या बाहेरील आहोत. यामुळे आपल्या वर्षभर आपल्या कुटुंबा सोबत वेळ घालवण्यासाठी खूप कमी दिवस मिळतात. जे कर्मचारी आपल्या घरापासून दूर राहतात, त्यांचा सण केवळ येण्या आणि जाण्यात प्रवासात सुट्ट्या वाया जाण्यात जायला नको असे त्यांचे मत आहे.
सोशल मीडियावर चर्चा आणि जबरदस्त प्रतिसाद
या पोस्टला एकीकडे लोकांची वाहवा आणि पॉझिटिव्ह पायंडा म्हटले जात असताना दुसरीकडे काही युजर्सने सवाल केला आहे की इतकी मुलभूत गोष्ट ( सणाची सुटी आणि हायब्रिड वर्क ) आजच्या काळात असाधारण सुविधा बनली आहे, वास्तविक ती सामान्य वर्क कल्चरचा एक भाग बनली पाहीजे होती.
मात्र, या चर्चे दरम्यान या पावलाचा फीडबॉक्सला जबरदस्त फायदा मिळाला. यश यांच्या मते एकाच दिवसात २५० हून जास्त अर्ज आले आहेत. ज्यात इंटर्न्स आणि फ्रेशर्सपासून ऑपरेशन्स हेड आणि CXO लेव्हलच्या उमेदवाराचा समावेश होता. या व्हायरल पोस्ट नंतर लिंक्डइनवर त्यांच्या फॉलोअर्समध्ये सुमारे १६ हजार वाढ झाली आहे. कंपनी आता या रेझ्युमेना फ्युचर हायरिंग ( खास करुन व्हिडीओ एडीटर्स आणि एआय एडिटर्सची भरती ) साठी सुरक्षित ठेवत आहे.
दीर्घकाल सुट्टी देऊनही कसे होते काम?
साल 2019 मध्ये स्थापन झालेली ही एजन्सी युनिकॉर्न आणि लिस्टेड स्टार्टअप्ससोबत काम करते. अशात एका आठवड्याचा ब्रेक मॅनेज करणे सोपे नसते. परंतू यश सांगतात की यासाठी संपूर्ण प्लानिंग तीन आठवड्या आधीच केले जाते.
क्लायन्ट्सना आधीच सुट्ट्यांची कल्पना दिली जाते, म्हणजे मोठे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केले जावेत. या दरम्यान कोणतेही नवीन काम घेतले जात नाही. केवळ आवश्यक रिक्वेटस्ट आणि छोट्या मोठ्या रिव्हीजन्सही पाहिले जातात. यश यांचे म्हणणे आहे की हा कोणताही पब्लिसिटी स्टन्ट नाही. त्यांची कंपनी अनेक वर्षांपासून या नियमाचे पालन करत आली आहे आणि पुढेही करत राहणार आहे.