AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर उदय सामंत यांचं मोठं विधान, तटकरे यांचं नाव घेत नेमकी काय व्यक्त केली शंका?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतली होती, तेव्हापासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर उदय सामंत यांचं मोठं विधान, तटकरे यांचं नाव घेत नेमकी काय व्यक्त केली शंका?
uday samantImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 5:46 PM
Share

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. याच दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. आता विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, परंतु जर अजित पवार असते तर 12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, त्यांनी मला तशी कल्पना दिली होती, असा दावा तटकरे यांनी केला आहे. दरम्यान त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले सामंत? 

काल जे मी सुनील तटकरे साहेबांची पत्रकार परिषद बघितली. त्यामध्ये थोडी तफावत वाटली, पूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये तटकरे म्हणाले होते की, विलीनीकरणाबाबत मला काही कल्पना नाही. काल तटकरे म्हणाले आहेत की 12 फेब्रुवारीला विलनीकरण होणार होतं. त्यामुळे या प्रश्नावर मी काहीच बोलू शकत नाही तटकरे साहेब यावर बोलू शकतात, प्रफुलभाई, उपमुख्यमंत्री सुनेत्रा  पवार आणि शरद पवार साहेबच या प्रश्नावर बोलू शकतात, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान मी शिवसैनिक आहे राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर कसं काय बोलू शकतो? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण कोणामध्ये विलीन होणार आहे हे सुद्धा मला माहिती नाही, हा त्या दोन्ही पक्षाचा प्रश्न आहे, असंही यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे, त्यातच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या विलिनीकरणासंदर्भात मोठं विधान केलं होतं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ती खरी दिवाळी असं आमदार रघुवंशी यांनी म्हटलं होतं, यावर देखील  यावेळी उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, शिवसेना पक्षावर फक्त आणि फक्त   शिंदे साहेबच बोलू शकतात, रघुवंशी साहेबांचं वैयक्तिक मत आहे, ते  पक्षाचे मत असू शकत नाही, असं सामंत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा