रेल्वेचा आता स्लीपर प्रवाशांना मोठा दिलासा, जानेवारी 2026 पासून सुरु होणार ही सुविधा

रेल्वेच्या प्रवास सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह असतो. वर्षाला सुमारे दीड ते दोन कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आता रेल्वेने स्लीपरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा सुरु केली आहे.

रेल्वेचा आता स्लीपर प्रवाशांना मोठा दिलासा, जानेवारी 2026 पासून सुरु होणार ही सुविधा
| Updated on: Nov 30, 2025 | 7:54 PM

स्लीपर क्लास प्रवाशांसाठी येत्या 1 जानेवारी 2026 पासून स्वच्छ बेडरोल सेवा सुरु करण्याची घोषणा दक्षिण रेल्वेच्या चेन्नई डिव्हीजनने केली आहे. एसी कोचनंतर आता स्लीपर क्लासमधील प्रवाशांना देखील ही सुविधा सुरु होणार आहे. प्रवासी या बेडरोलसाठी पैसे भरुन सेवा घेऊ शकणार आहे. प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादानंतर ही या योजनेला कायमस्वरुपी सुरु ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या सेवेने प्रवाशांना आराम मिळणार असून रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

दक्षिण रेल्वेच्या चेन्नई डिव्हीजनने पहिल्यांदाच स्लीपर क्लासच्या प्रवाशांना स्वच्छ आणि सॅनिटाईज्ड बेडरोल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा नव्या वर्षात 1 जानेवारी 2026 पासून सुरु होणार आहे.आधी बेडरोल केवळ एसी कोचमध्ये उपलब्ध होते. आता नॉन-एसी स्लीपर कोचमध्येही प्रवाशांच्या मागणीनुसार पैसे भरुन बेडरोल पुरवले जाणार आहेत.

ही सेवा NINFRIS (New Innovative Non-Fare Revenue Ideas Scheme) 2023-24 अंतर्गत सुरु केलेल्या यशस्वी पायलट प्रोजेक्टनंतर लागू केली जात आहे. प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादानंतर रेल्वेने ही योजना Permanent Non-Fare Revenue Scheme रुपात मंजूर केली आहे.

स्लीपर कोचमध्ये स्वच्छ बेडरोल सुविधा

रेल्वेच्या मते यामुळे स्लीपर क्लासच्या प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. लांबच्या प्रवासात बेडरोल न मिळाल्याने होणारी प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. या सेवेमुळे रेल्वेला अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. चेन्नईच्या डिव्हीजनच्या या योजनेने या योजनेत दरवर्षी 28,27,653 रुपये लायसन्स शुल्क रुपात मिळण्याची आशा आहे.

माफक दरात बेडरोल पॅकेज

दक्षिण रेल्वेने प्रवाशांसाठी तीन स्वस्त आणि सोपे पॅकेज जारी केले आहे

50 रुपयेवाला पॅक

एक बेडशीट

एक उशी

एक उशी कव्हर

30 रुपयेवाला पॅक –

एक उशी

एक उशी कव्हर

20 रुपयेवाला पॅक –

एक बेडशीट

हे पॅकेज अशा प्रकारे तयार केले आहेत की गरज आणि बजेटनुसार प्रवासी सहज ते स्वीकारू शकतात. स्वच्छता आणि हायजीन लक्षात घेऊन सर्व बेडरोल सॅनिटाईज्ड असतील.

पहिल्या टप्प्यात 10 प्रमुख ट्रेनमध्ये सेवा सुरू

ही सेवा सुरुवातीला 10 महत्वाच्या ट्रेनमध्ये पुढे 3 वर्षांसाठी लागू करण्यात आली असल्याचे चेन्नई डिव्हीजनने म्हटले आहे.

मँगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस (12685/12686)

मन्नारगुडी एक्सप्रेस (16179/16180)

तिरुचेंदूर सुपरफास्ट एक्सप्रेस (20605/20606)

पलघाट एक्सप्रेस (22651/22652)

सिलम्बू सुपरफास्ट एक्सप्रेस (20681/20682)

तांबरम–नागरकोइल सुपरफास्ट एक्सप्रेस (22657/22658)

तिरुवनंतपुरम सुपरफास्ट एक्सप्रेस (12695/12696)

अल्लेप्पी सुपरफास्ट एक्सप्रेस (22639/22640)

येथे पाहा पोस्ट –