Ram Mandir | ब्रह्म मुहूर्ताला म्हणजे पहाटे किती वाजता मोदी उठतात? किती तास तो खास जप करतात?

Ram Mandir | अयोध्या राम मंदिरात येत्या 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा होईल. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुष्ठान सुरु केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जमिनीवर घोंगडी अंथरुन झोपतात. अनुष्ठान असल्याने फक्त नारळ पाण्याचच सेवन करतात.

Ram Mandir | ब्रह्म मुहूर्ताला म्हणजे पहाटे किती वाजता मोदी उठतात? किती तास तो खास जप करतात?
pm modi following rituals for ayodhya ram mandir pran pratishtha
| Updated on: Jan 20, 2024 | 11:55 AM

Ram Mandir | सध्या सगळा देश राममय झाला आहे. प्रत्येकजण 22 जानेवारीची आतुरतेने वाट पाहतोय. 22 जानेवारीला रामललाच्या प्राण प्रतिष्ठेला काहीवेळ बाकी आहे. जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभूरामचंद्राच्या भक्तीमध्ये लीन झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राण प्रतिष्ठेच्या आधी 11 दिवसांच खास अनुष्ठान करत आहेत. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी जमिनीवर घोंगडी अंथरुन झोपतात. अनुष्ठान असल्याने फक्त नारळ पाण्याचच सेवन करतात.

अनुष्ठाना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज पहाटे ब्रह्म मुहूर्ताला 1 तास 11 मिनिट अध्यात्मिक जगतातील काही सिद्ध पुरुषांनी दिलेला मंत्र जाप करतात. हा जप 11 दिवस करण्याचा मोदींचा संकल्प आहे. अनुष्ठानच हे महत्वपूर्ण कार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रह्म मुहूर्ताला पूजा करत आहेत. त्यासाठी ते दररोज सकाळी 3 वाजून 40 मिनिटांनी उठतात व पूजा करतात. या दरम्यान मंत्र जाप करतात.

11 दिवसाच्या विशेष अनुष्ठानची घोषणा

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीपर्यंत विशेष अनुष्ठान आरंभ करण्याची घोषणा केली होती. याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर दिली होती. अयोध्येत रामललाच्या प्राण प्रतिष्ठेला 11 दिवस बाकी आहेत, असं पंतप्रधान मोदींनी लिहिल होतं. या क्षणाचा मी साक्षीदार बनणार हे माझं सौभाग्य आहे. आजपासून ते 11 दिवसांच विशेष अनुष्ठान सुरु होतय. या समयी त्या भावना शब्दात मांडण कठीण आहे, मी माझ्या बाजूने एक प्रयत्न केलाय, असं पीएम मोदींनी पुढे लिहिलय.

प्राण प्रतिष्ठेचा पहिला नियम काय?

हिंदू शास्त्रात देव प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा एक विशद आणि वृहद प्रक्रिया आहे. यासाठी अनेक नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांच पालन प्राण प्रतिष्ठेआधी कराव लागतं. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्राच्या निर्देशानुसार सर्व नियमांच पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पीएम मोदी प्राण प्रतिष्ठेच्या पहिल्या नियमानुसार, 11 दिवसाच अनुष्ठान करत आहेत.