पाकिस्तानच्या भिकाऱ्यांचा नाद खुळा! रहायला हवेली, SUV कार अन्…नेमकी भानगड काय?

खास गोष्ट म्हणजे पाकिस्तानात दोन प्रकारचे भिकारी आढळतात. एक जे तिथे भीक मागून कसेबसे आपले आयुष्य काढतात. तर दुसरे भिकारी असे आहेत ज्यांची मोठी स्वप्न असतात.

पाकिस्तानच्या भिकाऱ्यांचा नाद खुळा! रहायला हवेली, SUV कार अन्...नेमकी भानगड काय?
Beggar
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 22, 2025 | 6:36 PM

शेजारील देश पाकिस्तानातील लोक तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी भिक मागताना दिसतील. पण असंही नाही की पाकिस्तानातील सर्व भिकारी ओढावलेल्या परिस्थितीमुळे भिक मागतात. उलट, पाकिस्तानमध्ये भीक मागणे हा मोठा व्यवसाय बनला आहे. तेथील सधन लोकही याला एक व्यवसाय म्हणून स्वीकारत आहेत. भीक मागणे हे पाकिस्तानात आज एक मोठा व्यवसाय बनला आहे. इस्लामाबादने अधिकृतपणे आपल्या संसदेत सांगितले की, 2024 पासून आतापर्यंत सुमारे 5,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना परत त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता.

पाकिस्तानात भिकेचा मोठा व्यवसाय

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एका महिला डॉक्टरने दावा केला होता की, तिच्या लग्नानंतर काही महिन्यांनी तिला कळले की, तिच्या सासरच्यांकडे आलिशान घर, SUV, स्विमिंग पूल आणि इतर आलिशान वस्तू भिकेच्या पैशातून खरेदी केल्या गेल्या होत्या. त्यामुळे तिचे लग्न एका शाही भिकारी कुटुंबात झाले आहे.
वाचा: ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठे वळण! वडिलांनी घेतला यूटर्न, म्हणाले…

सर्वात खास गोष्ट म्हणजे पाकिस्तानात दोन प्रकारचे भिकारी आढळतात. एक जे तिथे भीक मागून कसेबसे आपले आयुष्य काढतात. तर दुसरे भिकारी असे आहेत ज्यांची मोठी स्वप्न असतात. हे भिकारी पाकिस्तान सोडून इतर देशांमध्ये भीक मागण्यासाठी जातात. तेथे ते भिकेतून बरेच पैसे कमावतात. हे सारे एका व्यवसायाच्या मॉडेलवर चालते. आज या भिकेच्या मॉडेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्यवसायाचे नवे मॉडेल

ज्याप्रकारे मार्केटिंगसाठी खास कौशल्यांची गरज असते, त्याचप्रमाणे पाकिस्तानातील लोक हा व्यवसाय स्वीकारून भीक मागत आहेत. कंपन्या आपले सामान ग्राहकांना विकण्यासाठी खास रणनीती बनवतात, त्याचप्रमाणे भिकारी खास प्रकारचे कपडे घालून, वेगळ्या लूकमध्ये दिसतात, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचे लक्ष वेधले जाईल आणि त्यांच्या भावनांना स्पर्श होईल.

नुकतेच पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, सर्वाधिक 4,498 भिकारी सौदी अरबमधून परत पाठवण्यात आले आहेत. त्यावर भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी असे म्हटले होते की, जिथे पाकिस्तान उभा आहे, तिथूनच भिकाऱ्यांची रांग सुरू होते. आता या वक्तव्यावर पाकिस्तान कशी प्रतिक्रिया देणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.