AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ज्याची भीती होती तेच घडणार, डोनाल्ड ट्रम्प भारताला देणार सर्वात मोठा झटका, ब्रिक्स शिखर परिषदेनंतर मोठी बातमी

भारतामध्ये ब्रिक्स शिखर परिषद होताच आता अमेरिकेमधून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतावर शंभर टक्के टॅरीफ लावला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेत हालचालींना वेग आला आहे.

अखेर ज्याची भीती होती तेच घडणार, डोनाल्ड ट्रम्प भारताला देणार सर्वात मोठा झटका, ब्रिक्स शिखर परिषदेनंतर मोठी बातमी
Donald TrumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 2:57 PM
Share

भारताने नुकतचं ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं. या शिखर परिषदेमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन देखील सहभागी झाले होते. दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची धमकी या आधीच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. अमेरिकन सीनेटने हे विधेयक गेल्या महिन्यात 7 ऑगस्ट रोजी मंजूर केले होते. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये हा कायदा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. आता लवकरच यावर मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे, हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवलं जाणार आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यास त्याचा मोठा फटका हा भारताला बसू शकतो.  भारतासह चीनला देखील याचा मोठा फटका बसणार आहे.

दरम्यान या विधेयकाला मंजुरी मिळाली तर जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर शंभर टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. त्यामुळे भारत काय भूमिका घेणार? अशा स्थितीमध्ये रशियाकडून तेलाची खरेदी बंद करणार का? असा प्रश्न निर्माण होत होता, परंतु अखेर आता भारताची भूमिका समोर आली आहे. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबवणार नसल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आलं आहे.  मात्र जर दुसरीकडे अमेरिकेनं शंभर टक्के टॅरिफ लावलाच तर त्याचा मोठा फटका हा भारताला बसू शकतो.

नेमका काय होणार परिणाम? 

अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर टॅरिफ लावल्यास भारतीय वस्तू अमेरिकेत प्रचंड महाग होतील. यामुळे निर्यात प्रचंड प्रमाणात कमी होऊ शकते, ज्याचा थेट फटका हा देशाच्या जीडीपीवर होऊ शकतो. तसेच अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंची मागणी घटल्यामुळे याचा परिणाम काही विशिष्ट क्षेत्रांवर होऊ शकतो. त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अशी परिस्थिती उद्भवल्यास परदेशी गुंतवणूकदार देखील सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे.

Follow Us
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष