मध्यपूर्वेतून मोठी बातमी; 14 क्रू मेंबर्स असलेलं भारतीय जहाज बुडालं, मोठी खळबळ

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवर हल्ल्यांच्या तीन घटना घडल्या होत्या, या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यांनंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मध्यपूर्वेतून मोठी बातमी; 14 क्रू मेंबर्स असलेलं भारतीय जहाज बुडालं, मोठी खळबळ
भारतीय जहाज बुडालं
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2026 | 6:47 PM

एकीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये इराण आणि अमेरिकेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील स्थिती व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी फार काही चांगली नाहीये. अनेकदा या जहाजांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर दुसरीकडे आता रविवारी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ओमानच्या किनार्‍याजवळ भारतीय झेंडा असलेलं जहाज विराट बुडालं आहे. या जहाजामध्ये 14 भारतीय क्रू मेंबर असल्याची माहिती समोर आली आहे. जहाजामध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे हे जहाज बुडाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ओमानचे अधिकारी, अमेरिकेचं नौदल आणि या परिसरात असलेल्या इतर जहाजांवरील क्रू मेंबर्सनी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. समोर आलेल्या माहितीनुसार या जहाजावरील 14 ही क्रू मेंबर्सला वाचवण्यात यश आलं आहे.

ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास ओमानच्या रास अल हद्द पासून पूर्व दिशेला 80 मैल नॉटिकल अंतरावर घडली आहे, या जहाजावर 14 भारतीय क्रू मेंबर्स होते. तांत्रिक कारणामुळे हे जहाज बुडालं, त्यानंतर राबवण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे 14 ही लोकांचा जीव वाचला आहे. त्यांना या जहाजामधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. घटनेची माहिती मिळताच अमेरिकेच्या नौदलाने P-8 मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट घटनास्थळी पाठवलं होतं.

समोर आलेल्या माहितीनुसार या जहाजाचं इंजिन खराब झालं होतं, त्यानंतर जहाजामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आणि जहाज बुडालं. जहाज बुडत असल्याचं लक्षात येताच या जहाजावरील क्रू मेंबर्सनी तातडीचा संदेश जारी केला. संदेश मिळताच अमेरिकन सैन्य दलाने बचावकार्य सुरू केलं. 14 जणांना या जहाजावरून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या वेगवेगळ्या जहाजांवर तीन हल्ले झाले होते. या हल्ल्यांमध्ये तीन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. अमेरिकेकडून या जहाजांवर हल्ला झाल्याची माहिती आहे, पंरतु अमेरिकेनं या हल्ल्याचा आरोप इराणवर केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us