AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची माघार, टॅरिफबाबत केली मोठी घोषणा

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो, त्यामुळे अमेरिकेकडून ही घोषणा करण्यात आली, जगात एक नवं टॅरिफ वॉर सुरू झालेलं असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची माघार, टॅरिफबाबत केली मोठी घोषणा
डोनाल्ड ट्रम्प Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 15, 2025 | 2:52 PM
Share

अमेरिकेनं भारतावर 50  टक्के टॅरिफ लावला आहे, याचा फटका हा सध्या दोन्ही देशांना बसत असल्याचं दिसून येत आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर टॅरिफ लावल्याचं अनेकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. तसेच भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी आपली भूमिका देखील अनेकदा त्यांनी मांडली आहे. भारत हा रशियाकडून तेलाची खरेदी करतो त्याचा फायदा हा रशियाला होत आहे. रशिया भारत आणि चीनकडून मिळालेल्या पैशांचा वापर हा युक्रेनविरोधातील युद्धामध्ये करत आहे, त्यामुळे युद्धविराम होत नसल्याचा आरोप देखील ट्रम्प यांनी केला आहे.

मात्र आता ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय हा त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. अमेरिकेमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे, जीवानावश्यक वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत. सर्व सामान्य लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत, अमेरिकेमध्ये कोणत्याही क्षणी मोठ्या आंदोलनाला सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती आहे. ट्रम्प यांना आपल्या या निर्णयाचा फटका यापूर्वीच न्यूयार्कच्या महापौराच्या निवडणुकीमध्ये बसला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फळं, बीफ, कॉफी, चहा यासारख्या खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे घेण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी या निर्णयावर सही देखील केली आहे. त्यामुळे महागाई कमी होऊन अमेरिकेतील लोकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट फायदा आता इक्वाडोर, ग्टाटेमाला, अर्जेटिंना यासारख्या देशांसह अनेक देशांना होणार आहे.

भारताबाबत गुड न्यूज म्हणजे अमेरिकेत ज्या पद्धतीनं आता महागाई वाढत आहे, ते पाहून ट्रम्प हे आता लवकरच भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या खाद्यपदार्थांवर असलेला टॅरिफ मागे घेणार असल्याची बातमी देखील समोर येत आहे. त्यांनी याबाबत यापूर्वी देखील अनेकदा संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर त्याचा मोठा परिणाम हा भारत आणि अमेरिकेच्या व्यापारावर झाला असून, भारताचा चीन आणि रशियासोबत व्यापार वाढला आहे, याचा सर्वात मोठा फटका हा महागाईच्या रुपानं अमेरिकेला बसत असून, लवकरच भारताच्या टॅरिफबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ