AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Economy Growth : भारताने ट्रम्पना दाखवलं तु्म्ही आमचं काही बिघडवू शकत नाही, मूडीजचा रिपोर्ट आला GOOD NEWS

India Economy Growth : रेटिंग एजन्सी मूडीजचा ‘ग्लोबल मॅक्रो आऊटलूक 2026-27’ चा रिपोर्ट आला आहे. हा रिपोर्ट डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची जागा दाखवून देणारा आहे. हा नवीन भारत काय करु शकतो ते ट्रम्प यांना कळलं असेल. या रिपोर्टमध्ये काय म्हटलय?.

India Economy Growth : भारताने ट्रम्पना दाखवलं तु्म्ही आमचं काही बिघडवू शकत नाही, मूडीजचा रिपोर्ट आला GOOD NEWS
Modi-Trump
| Updated on: Nov 13, 2025 | 4:25 PM
Share

Indian Economy Growth : जगभरातील अर्थव्यवस्था भले सुस्तावलेल्या असतील, पण भारताचा वेग कायम राहणार आहे. प्रसिद्ध रेटिंग एजन्सी मूडीजने आपला ‘ग्लोबल मॅक्रो आऊटलूक 2026-27’ चा रिपोर्ट जारी केला आहे. भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढची दोन वर्ष 2027 पर्यंत G-20 देशांच्या समूहात भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. भारताचा विकास दर 6.5 टक्के राहिल असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अमेरिकेचा 50 टक्के टॅरिफचा निर्णयही भारातच्या प्रगतीला रोखू शकणार नाही. भारताची ही मजबूती भक्कम आहे. मूडीजनुसार, देशात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणारी गुंतवणूक, बाजारात ग्राहकांची मागणी आणि एक्सपोर्ट विविधता याला ताकद देतायत.

रिपोर्टनुसार, अमेरिकेने भारतीय उत्पादनावर 50 टक्के टॅरिफ लावला. त्यावेळी भारतीय निर्यातदारांनी हुशारी दाखवत नवीन बाजार शोधून काढले. भले, अमेरिकेला होणारी निर्यात 11.9 टक्क्याने कोसळली. पण भारताचा एकूण एक्सपोर्ट सप्टेंबर महिन्यात 6.75 टक्क्याने वाढला. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था पूर्वीप्रमाणे कुठल्या एका देशावर अवलंबून नाही. या प्रगतीमध्ये देशाच्या अंतर्गत धोरणांची मोठी भूमिका आहे. मूडीजनुसार, रिझर्व्ह बँकेचं धोरण त्यामुळे महागाई नियंत्रणात आहे. RBI ने ऑक्टोंबरमध्ये रेपो रेट बदलेला नाही. त्यामुळे ग्रोथसाठी एक चांगलं वातावरण तयार होतं.

भारताचं प्रायवेट सेक्टर अजूनही का कचरतय?

त्याशिवाय परदेशी गुंतवणूदारांचा भारतावर भरवसा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून येणारा कॅपिटल इनफ्लो, कुठलाही बाहेरील धक्का सहन करण्यासाठी देशाला मदत करतोय. बाजारात रोख (लिक्विडिटी) आहे. देशांतर्गत मागणी चांगली आहे. पण प्रायवेट सेक्टर अजूनही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी कचरतोय असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

अमेरिकेत वेग कमी आहे. पण स्थिर आहे. AI मध्ये गुंतवणूक आणि ग्राहक खर्चाने आधार मिळतोय.

युरोपात किरकोळ सुधारणा आहे. जर्मनीचा संरक्षण आणि ग्रीन टेक्नोलॉजीत खर्च वाढलाय. त्यामुळे ग्रोथ म्हणजे वाढीला मदत मिळतेय.

चीनचा 2025 मध्ये 5% ग्रोथ होऊ शकतो. हे सरकारी मदत आणि एक्सपोर्टवर आधारित आहे. त्यांच्या देशात मागणी कमजोर आहे आणि गुंतवणूक कमी होतेय. मुडीजचा अंदाज आहे की, 2027 पर्यंत चीनचा ग्रोथ कमी होऊन 4.2% टक्के राहीलं.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.