Prashant Kishor Election Result Update : प्रशांत किशोर यांच्याकडून भाजपला धक्का, विजयासाठी लाडू आणून ठेवलेत पण..

Prashant Kishor Election Result Update : ज्या प्रशांत किशोर यांनी इतर पक्षांना सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवलं, त्यांना मात्र अजून निवडणुकीत यश मिळवता आलेलं नाही. त्यांनी स्थापन केलेल्या जनसुराज पार्टीची मोठी हवा झाली. पण बिहार विधानसभा निवडणुकीत पदरात यश मिळालं नाही.

Prashant Kishor Election Result Update : प्रशांत किशोर यांच्याकडून भाजपला धक्का, विजयासाठी लाडू आणून ठेवलेत पण..
Prashant Kishor
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 03, 2026 | 10:43 AM

आज तीन राज्यातील तीन विधानसभा पोट निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. बिहारच्या बांकीपूर, मध्य प्रदेशच्या दतिया आणि गुजरातच्या मांजलपूर विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. यात बिहारच्या बांकीपूरच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. कारण इथून प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर निवडणूक लढवत आहेत. ज्या प्रशांत किशोर यांनी इतर पक्षांना सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवलं, त्यांना मात्र अजून निवडणुकीत यश मिळवता आलेलं नाही. त्यांनी स्थापन केलेल्या जनसुराज पार्टीची मोठी हवा झाली. पण बिहार विधानसभा निवडणुकीत पदरात यश मिळालं नाही. आता ते बांकीपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आपलं नशीब आजमवत आहेत.

बिहारच्या बांकीपूरमध्ये मतमोजणीचा पहिला राऊंड संपला आहे. पहिल्या फेरीअखेर जन सुराज पार्टीचे उमेदवार प्रशांत किशोर आघाडीवर आहेत. पहिल्या राऊंड अखेरीस त्यांना 2200 मतं मिळाली आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार 1,423 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तेच राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवाराला 501 मतं मिळाली आहेत. दोन राऊंडच्या मतमोजणीत प्रशांत किशोर आघाडीवर आहेत. भाजपला विजयाचा पूर्ण विश्वास आहे, त्यांनी लाडू बनवून ठेवले आहेत.

 

प्रशांत किशोर निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

बिहारच्या बांकीपूरमध्ये सर्वात कमी 34.30 टक्के मतदान झालं होतं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर गेल्यानंतर बिहारच्या बांकीपूरची जागा रिक्त झाली. भाजपने इथून नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिलीय. ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते. पण प्रशांत किशोर रिंगणात असल्याने निकालाबद्दल उत्सुक्ता निर्माण झाली आहे. गुजरातच्या मंजलपूरमध्ये 37.50 टक्के आणि मध्य प्रदेशच्या दतिया सीटवर सर्वात जास्त 71.44 टक्के मतदान झालय.

दतियाच्या जागेवरुन मोठा राडा झालेला

गुजरातच्या मांजलपुरमधून भाजपचे सतीश गोविंदभाई पटेल आघाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवार पिछाडीवर आहे. दातियामधून भाजपचे आशुतोष तिवारी आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशच्या दतियाच्या जागेवरुन मोठा राडा झाला होता. हिंसक विरोध प्रदर्शन झालं होतं. दतियामध्ये भाजपचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याजागी आशुतोष तिवारी यांना उमेदवार बनवण्यात आलं. नरोत्तम मिश्रा यांना तिकिट दिलं नाही म्हणून दतियामध्ये मोठा गदारोळ झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us