हे दुटप्पी लोक, फक्त हिंदू सणांच्यावेळीच… नसीरुद्दीन शाह आणि दिया मिर्झावर भाजपचा हल्लाबोल

दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडिओवरून सुरू झालेला वाद आता नसीरुद्दीन शाह यांच्यापर्यंत पोहोचला आहे. पर्यावरण आणि प्रदूषणाबाबत हिंदू सणांच्या वेळीच चिंता व्यक्त केली जाते, असा आरोप भाजपने केलाय.

हे दुटप्पी लोक, फक्त हिंदू सणांच्यावेळीच... नसीरुद्दीन शाह आणि दिया मिर्झावर भाजपचा हल्लाबोल
BJP accuses Diya Mirza and Naseeruddin Shah
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 5:37 PM

भाजपने आता अभिनेत्री दिया मिर्झा आणि अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर पर्यावरणाच्या मुद्द्यांवरून निवडक संताप व्यक्त दाखवल्याचा आरोप केला आहे. हे दोन्ही नेते हे निवडक वेळी म्हणजे हिंदू सणांच्या वेळी प्रदूषण आणि पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त करायला लागतात. पण इतर धर्मांचे सण आले की गप्प बसताता. असे वर्तन म्हणजे निवडक राग व्यक्त करण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नही निर्माण होेत आहे. पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटीयांनी यांनी मीडियाशी संवाद साधतनाना हे वक्तव्य केलं.

जेव्हा तुम्ही म्हणता की, पर्यावणाला जपलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, पण असं तुम्ही ईद किंवा बकरी ईद येते तेव्हा बोलत नाही. बकऱ्यांच्या कत्तलींमुळे प्रचंड जलप्रदूषण होते. तेव्हा नसीरुद्दीन शाह आणि दिया मिर्झा कुठे असतात. यांच्यासारखे लोक तेव्हा मात्र चकार शब्दही काढत नाहीत. हा सगळा दुटप्पीपण आहे.

Loading...

मुंबई बीएमसीच्या पर्यावरणपूरक फटाकेमुक्त दिवाळी मोहिमेसाठी दिया मिर्झाच्या व्हिडिओवरुन वाद पेटलेला आहे. त्यानंतर कोर्टाने दियाचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यात यावा असे आदेश दिले असून काही नेत्यांच्या वक्तव्याने मन व्यथित झाले, असे निरिक्षणही नोंदवले आहे. यावर बोलताना भाटियांनी सांगितलं की, आपण न्यायालयाचे आदेश पाहिलेले नाहीत आणि त्यामुळे यावर बोलणे योग्य ठरणार नाही. पण फक्त निवडकवेळीच पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करणं योग्य नसून ती प्रत्येकवेळी करा. नागरिक हा नेहमी नागरिकच राहतो. त्यांना पर्यावरणाची काळजी वाटते, तर त्यांना ती नेहमीच वाटली पाहिजे, यामध्ये गैर काहीही नाही. तुम्ही हिंदू सणांच्यावेळी वेगळी भूमिका मांडणार, तुमच्या प्रथांबद्दल तुम्ही गप्प राहणार, हा दुटप्पीपणा आहे.

या लोकांमध्ये विश्वासार्हतेचा अभाव आहे. त्यांनी हिंदू लोकांना कोणताही सल्ला देण्याची गरज नाही. न्यायालयाचा आदर झाला पाहिजे, देश कायद्यानुसार चालतो, सर्व नागरिकांनी त्याचा आदर करतात. हिंदूही सहिष्णू असूुन ते संविधानाचा आदर करतात, यापूर्वीही हिंदूंनी न्यायालयांच्या निर्णयांचा सन्मान करुन दिवाळी साजरी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us