निष्काळजीपणाने नाही तर भ्रष्ट्राचाराने घेतला जीव, भाजपच्या प्रवक्त्याचे घणाचे घाव..

मोरबी पुलाची दुर्देवी घटना ही फक्त भ्रष्टाचारामुळे झाली आहे. मात्र ज्यांचा जीव गेला आहे, त्यांची जबाबदारी कोण घेणार असा सवाल भाजप प्रवक्त्यानेच केला आहे.

निष्काळजीपणाने नाही तर भ्रष्ट्राचाराने घेतला जीव, भाजपच्या प्रवक्त्याचे घणाचे घाव..
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 3:46 PM

नवी दिल्लीः गुजरातमध्ये रविवारी रात्री घडलेल्या मोरबी पुलाच्या दुर्देवी घटनेबद्दल जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यातच गुजरात सरकारवरही प्रचंड टीका केली जात आहे. एकीकडे हे सुरु असतानाच गोवा भाजपच्या प्रवक्त्यानेही भाजपवरच निशाणा साधला आहे. या प्रकरणी भाजपच्या गोवा विभागाचे प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्स यांनी ट्विट करत भाजपवरच जोरदार टीका केली आहे. त्यामुळे गोवा राज्यातील भाजपही आता गोत्यात आले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, मोरबी पुलाची घडलेली घटना दु:खद आणि भयावह आहे.

यामध्ये अनेक चुका आहेत. याबद्दल जर आपण जबाबदारी घेतली नाही तर याचा अर्थ आपण आपल्या लोकांची काळजी घेत नाही असा होतो. अशा दुर्दैवी दु:खद अपघाताला भ्रष्टाचाराच मूळ कारण आहे.

भ्रष्टाचारामुळेच 49 मुलांना आपला जीव गमवावा लागला तर 134 लोकांचा यामध्ये हाकनाक मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे गोवा विभागाचे प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्स यांनी मोरबी दुर्देवी घटना ही भ्रष्टाचाराचे मूळ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी त्या प्रकारचे ट्विट केल्यानंतर त्यांच्या या ट्विटला अनेकांनी प्रतिसाद देत टीकेची झोड उठवली आहे.

सॅव्हियो रॉड्रिग्स यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या असल्या तरी, फ्रँकी नावाच्या युजरने लिहिले की, “हे खूप दुःखद आहे! 100 पेक्षा जास्त लोकांना हाताळण्याची क्षमता नसलेल्या पुलावर त्यापेक्षा जास्त लोकांना परवानगी का देण्यात आली.

असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता या अपघाताचा अहवाल काय येतो त्याची वाट बघणेही महत्वाचे आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

तर रॅग नावाच्या दुसर्‍या एका युजरने लिहिले आहे की, जुना पूल असताना आणि क्षमतेपेक्षा जास्त लोकांना त्या पुलावर का जाऊ दिले असं सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पुलाची क्षमता कमी असतानाही क्षमतेपेक्षा जास्त लोकं तिथे गेली आहेत, आणि पुलावर नाचत असल्याचेही दिसत आहे जे साफ चुकीचे आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.