
बांगलादेशमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या, निवडणुकीचा निकाल देखील समोर आला आहे. बांगलादेशमध्ये कोणाची सत्ता येणार हे देखील आता स्पष्ट झालं आहे. आता नव्या पंतप्रधानांचा शपथविधी कधी होणार येवढाच प्रश्न बाकी आहे. तारिक रहमान यांच्या बीएनपी पक्षानं बांगलादेशमध्ये दणदणीत यश मिळवलं आहे. आता लवकरच तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बांगलादेशमध्ये सरकारची स्थापना होणार असून, तारिक रहमान हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मात्र बांगलादेशमध्ये या निवडणुकीत अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे तुम्हालाही धक्का बसू शकतो. बांगालादेशच्या निवडणुकीत बिजेपीचा एका जागेवर विजय झाला आहे. गुरुवारी बांगलादेशमध्ये 13 वी लोकसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीत बिजेपीने एक जागा जिंकली आहे.
मात्र थोड थांबा तुम्ही ज्या पक्षाबद्दल विचार करत आहात तो हा बीजेपी पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही तर हा पक्ष आहे, बांगलादेशमधील बेजेपी या पक्षाचा फुलफॉर्म बांग्लादेश जातीय पक्ष असं आहे. याचा इग्रंजीमध्ये शॉर्ट फॉर्म BJP असा होतो. या निवडणुकीमध्ये बीजेपी हा बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP चा मित्र पक्ष होता. बीजेपी बांग्लादेश जातीय पार्टीने एक जागा जिंकत आपलं खातं उघडलं आहे. बीजेपीचे उमेदवार अंदलीव रहमान हे भेला लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार अंदलीव रहमान यांना 105,543 मतं मिळाले तर त्यांच्या विरोधात उभा असलेले जमात-ए-इस्लामी पार्टीचे उमेदवार मोहम्मद नज़रुल इस्लाम यांना 75,337 एवढे मतं मिळाले. या निवडणुकीत बीजेपीच्या उमेदवाराचा मोठा विजय झाला आहे. दरम्यान दुसरीकडे बांग्लादेशमध्ये बीएनपीची सत्ता येताच बीएनपीच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मोठं विधान केलं आहे, आम्ही बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना बांग्लादेशमध्ये प्रत्यार्पित करण्यासाठी भारतावर दबाव टाकू असं त्यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता भारत आणि बांग्लादेश मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या काळजीवाहू सरकारने देखील शेख हसिना यांना भारताने बांगलादेशकडे सोपावं अशी मागणी केली होती.