मोठी बातमी! इराण हादरलं, युद्ध पुन्हा सुरू होणार? अमेरिकेकडून थेट 100 फायटर जेट, 17 युद्धनौका मैदानात

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता आणखी वाढला असून, अमेरिकेकडून तब्बल 100 पेक्षा अधिक फायटर जेट आणि 17 युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात करण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी! इराण हादरलं, युद्ध पुन्हा सुरू होणार? अमेरिकेकडून थेट 100 फायटर जेट, 17 युद्धनौका मैदानात
Donald Trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 23, 2026 | 8:40 AM

स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूजची खाडी व्यापारी जहाजांना खुली करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र जोपर्यंत इराणसोबत डील फायनल होत नाही, तोपर्यंत आम्ही स्ट्रेट ऑफ होर्मूजमधली नाकेबंदी कायम ठेवणार असल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं, अमेरिकेच्या या भूमिकेमुळे दुसऱ्याच दिवशी इराणने आपण देखील स्ट्रेट ऑफ होर्मूज जगासाठी पुन्हा एकदा बंद करत आहोत, अशी घोषणा केली. त्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणाव आता आणखी वाढला आहे. शुक्रवारपासून अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या चर्चेसाठी आपलं शिष्टमंडळ पाठवण्यास उत्सुक आहेत, मात्र इराणकडून अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये.

याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इराणसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं आता स्ट्रेट ऑफ होर्मूजमधली आपली नाकेबंदी अधिक कडक केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड नौदलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत इराणच्या तब्बल 31 जहाजांना अमेरिकेनं अडवलं असून, त्यांना युटर्न घेण्यास भाग पाडलं आहे. 13 एप्रिलपासून अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदीला सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण स्ट्रेट ऑफ होर्मूजच्या सामुद्रधुनीमध्ये आमने-सामने आले आहेत.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांड नेव्हीने दिलेल्या माहितीनुसार स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेनं मोठ्याप्रमाणात सैन्यबळाचा वापार केला आहे. सध्या स्थितीमध्ये स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये अमेरिकेचे तब्बल 10,000 हजारांपेक्षा जास्त सैनिक तैनात केले आहेत. सोबतच 100 पेक्षा अधिक फायटर जेट आणि 17 युद्धनौका या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच एअरक्राफ्ट कॅरिअर, मिसाइल डिस्ट्रॉयर, आणि अनेक ड्रोन देखील अमेरिकेकडे आहेत.

होर्मूजची सामुद्रधुनी कधीपर्यंत सुरू होणार?

अमेरिका आणि इराणमधील तणाव पहाता होर्मूजची सामुद्रधुनी कधीपर्यंत सुरू होणार याचा सध्या तरी अंदाज व्यक्त केला जाऊ शकत नाहीये, मात्र तज्ज्ञांच्या मते जर समजा अमेरिका आणि इराणमधील चर्चेची दुसरी फेरी यशस्वी ठरली तर 30 जूनपर्यंत स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एका सुरळीत सुरू होऊ शकतो. मात्र जर तणाव असाच राहिला तर मात्र जगावर मोठं इंधन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

Follow Us