Budget 2025 : निर्मला सीतारमण यांनी मांडलं देशाचं बजेट, काय स्वस्त-काय महाग?

Budget 2025 : निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये विविध घोषणा केल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागल्या आहेत. त्या बद्दल जाणून घेऊया.

Budget 2025 : निर्मला सीतारमण यांनी मांडलं देशाचं बजेट, काय स्वस्त-काय महाग?
अर्थसंकल्पातून जनतेच्या अपेक्षा काय ?
| Updated on: Feb 01, 2025 | 12:57 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट वाचन सुरु आहे. त्या मोदी 3.0 सरकारच दुसरं बजेट मांडत आहेत. निर्मला सीतारमण यांच्या बजेटकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे. सर्वसामान्य, नोकरदार, व्यापारी आणि उद्योजक सगळ्यांचेच या बजेटकडे डोळे लागले आहेत. निर्मला सीतरमन यांच्या बजेटकडून काय मिळणार? हीच प्रत्येक घटकाची अपेक्षा आहे. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करताना अर्थव्यवस्थेचा वेग वाढवणं आणि नव्या नोकऱ्यांची निर्मिती हा बजेट मांडताना निर्मला सीतारमण यांचा उद्देश असेल. निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये विविध घोषणा केल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागल्या आहेत. त्या बद्दल जाणून घेऊया.

कुठली औषध स्वस्त?

36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट जाहीर झाली आहे. कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आगहे. कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली आहे.

काय स्वस्त होणार?

LED स्वस्त

भारतात बनवलेले कपडे

मोबाइल फोन बॅटरी

82 सामानांवरुन सेस हटवला

लेदर जॅकेट

बूट

बेल्ट

पर्स

ईवी वाहन

LCD

LED टीव्ही

हँडलूम कपड़े

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाढती लोकसंख्या लक्षात घेता डॉक्टर्सची संख्या सुद्धा वाढेल.

आयआयटीच्या 6500 जागा वाढवण्यात येणार आहेत.

देशात 3 AI एक्सल्स सेंटर उभारणार.

डाळींमध्ये स्वावलंबी होण्याचा प्रयत्न 

डाळींमध्ये स्वावलंबी होण्यासाठी सरकार 6 वर्षांचा कार्यक्रम सुरू करणार. तूर, उडीद आणि मसूर या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि किफायतशीर दर देण्यासाठी व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.