Hema Malini : आयुष्यातील सर्वात वाईट काळ…, धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न, हेमा मालिनी यांच्यावर आलेली मनाविरुद्ध काम करण्याची वेळ
Hema Malini : लग्नानंतर धर्मेंद्र यांच्याकडून एकही रुपये घेतला नाही, कठीण काळात हेमा मालिनी यांच्यावर का आलेली मनाविरुद्ध काम करण्याची वेळ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Hema Malini : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाबद्दल आज सर्वांना माहिती आहे. कुटुंबिय आणि समाजाच्या विरोधात जात धर्मेंद यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी दुसरा संसार थाटला. पण धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी आर्थिक संकटांचा सामना करावा लागला… तब्बल 10 वर्ष हेमा मालिनी यांनी वाईट दिवसांचा अनुभव घेतला. या काळात हेमा मालिनी यांना मोठं कर्ज फेडावं लागलं. लेखक राम कमल मुखर्जी यांचं पुस्तक, हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल मध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठ्या गोष्टी लिहिण्यात आल्या आहे…
आर्थिक अडचणीत अडकल्यानंतर हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. पण हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याकडून एकही रुपया घेतला नाही… स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हेमा मालिनी यांनी वाईट दिवसांचा सामना केला… याबद्दल हेमा मालिनी यांनी सांगितलं. ‘माझी आई कर भरण्यासाठी टाळाटाळ करायची… वडीला तिला सतत आठवण करुन द्यायचे की कर भरायचं आहे…’
View this post on Instagram
हेमा यांच्या आई असा विचार करायच्या की, इतक्या मेहनतीने कमावलेल्या पैशांचा उपयोग कर भरण्यासाठी का करायचा… वडिलांच्या निधनानंतर, हेमा यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. लवकर पैसे उभे करण्यासाठी, त्यांना शक्य तितके चित्रपट करावे लागले आणि परिणामी, त्यांनी अनेकदा बी-ग्रेड सिनेमांमध्ये देखील मनाविरुद्ध काम करावं लागलं… ते दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होते… असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.. तब्बल 10 वर्ष हेमा मालिनी यांनी वाईट दिवसांचा सामना केला.
अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन
24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मृत्यूपूर्वी काही दिवस धर्मेंद्र यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांच्यावर रुग्णालयात देखील उपचार सुरु होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरीच धर्मेंद्र यांचे उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
